"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चीन दाट धुरके व धुलीकणांच्या प्रदुषणानी ग्रस्त
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
अण्विक-जिवाश्म-युगापासून दूर आणि अणु ऊर्जा दुर्घटना
ओळ ८१:
कठीण असे व सरकारने विहीत केलेले पर्यावरण संरक्षण उपाय आणि नविनीकरणक्षम ऊर्जा व ऊर्जाकार्यक्षमता यांच्या जाहीरातीमध्ये दर्शविल्याप्रमाणे, प्रामुख्याने असे व्यवसाय जे [[कोळसा विद्युत केंद्र|कोळसा विद्युत केंद्राशी]] संबंधीत असल्यामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होते त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये चीन मध्ये पुनर्विचारासाठी मार्गदर्शन घेतले. [[पवन ऊर्जा|पवन ऊर्जा प्रकल्प]], [[सौर सेल|सौर-पट्ट्या]] आणि [[अद्यावत-पारेषण]]-तंत्रज्ञानाच्या उत्पादन आणि उपयोजनात [[चीन]] हे राष्ट्र [[इ.स. २०१३]] मध्ये जागतिक बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर होते; याशिवाय पुनरुत्पादित ऊर्जेतला सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीत जगातील सर्वात महत्वाचा हा देश आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=मॅथ्युज|first=जॉन|last2=टान|first2=हाओ|date=२०१४|title=(Economics: Manufacture renewables to build energy security)|url=http://www.nature.com/articles/513166a|journal=Nature|language=इंग्रजी|volume=513|issue=7517|pages=१६६-१६८|doi=|issn=|via=}}</ref>
[[चित्र:Haze over China Jan 13 2013 0530Z.jpg|इवलेसे|चीन वरील धुरके. नासाच्या सॅटेलाइटने इ.स. २०१३ मध्ये घेतलेले छायाचित्र.]]
खासकरून इ.स २०१३ व २०१४ च्या „प्रदुषणाच्या धक्क्या“ नंतर, जेव्हा लाखो-करोडो चिनी लोकं दाट [[धुरके]] व [[धुलीकण|धुलीकणांच्या]] प्रदुषणानी ग्रस्त झाले होते, आणि वायूप्रदुषण देशाचा एक महत्वाचा आर्थिक व सामाजिक विषय झाला होता ज्यामुळे, प्रयत्न तीव्र केले गेले आणि पर्यावरणास अधिक अनुकूल अशा ऊर्जा प्रणालीच्या दिशेने अनेक उपायांच्या अवलंबनाचा प्रारंभ केला गेला. या पध्दतीने धुळ व धुर प्रदुषण कमी करण्यासाठी इतर गोष्टींसोबतच एक योजना आखली गेली; याशिवाय खुप जास्त प्रदुषण असणाऱ्या प्रदेशात कोळसा विद्युत केंद्राच्या नवीन बांधकामास बंदी घालण्यात आली आणि इ.स २०१५ साठी दळणवळण क्षेत्रात [[वाहन उत्सर्जन मानक|युरो-५-मानक]] याचे अवलंबन निश्चित करण्यात आले, ज्यामुळे जास्त वायु प्रदुषण करणारी [[वाहन|वाहने]] रस्त्यावर येणार नाहीत. युरो-५-मानक २०१७ हे राष्ट्रीय दृष्टीने कायदेशीर झाले. याशिवाय इ.स. २०३० पर्यंत पुर्ण ऊर्जा वापरात कोळशाचा वाटा ६६.६% वरून ५०% च्या खाली गेले पाहीजे, तर नविनीकरणक्षम ऊर्जेचा वाटा इ.स. २०१२ च्या फक्त १०% वरून इ.स. २०३० पर्यंत २५% वर गेले पाहीजे. जरी हे उपाय पर्यावरणीय प्रदुषण कमी करण्यासाठी निश्चित केले असले तरी, या ध्येयापुर्ती सोबतच हरितगृह वायू उत्सर्जन सुध्दा नक्कीच कमी होतील.<br />
 
याशिवाय जगातील अनेक देशांसाठी नविनीकरणक्षम ऊर्जा स्वीकारण्यास जीवाश्म इंधनाच्या बचतीची मध्यवर्ती भूमिका आहे, कारण ऊर्जा-आयात कमी करणे आणि पुरवठा संरक्षण मिळविणे या दोन्ही गोष्टींची त्यात क्षमता आहे. त्याचप्रमाणे ऊर्जा-स्तोत्रांसंबंधी [[युद्ध|लष्करी संघर्षाचा]] धोका कमी होईल. „अण्विक-जिवाश्म-युग“ यापासून दूर जाणे हे अनेक संकटांना दिलेली प्रतिक्रिया म्हणून बघितले जाते, जे [[फुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प|फुकूशिमाचा]] अण्विक दुर्घटना ([[चेर्नोबिल दुर्घटना|चेर्नोबिल दुर्घटनेनंतर]] या घटनेने पुन्हा एकदा अण्विक ऊर्जानिर्मितीची असुरक्षीतता दाखवून दिली), हवामान बदल, शेतीवर आधारीत इंधन उत्पादनामुळे व अनुमानामुळे झालेले अन्नधान्य संकट ([[अन्न वि. इंधन]] आणि [[अन्नधान्य संकट इ.स. २००७-२००८]] पहा), [[महानगर|महानगरातील]] वायु प्रदुषण. ह्या अनेक संकटांनी पुनर्रचनेची आणि उपायांची मागणी केली.
 
==== जर्मनी   ====