३२,४८५
संपादने
छो (Pywikibot 3.0-dev) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit |
||
मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला. 'ह बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव समजून घेतले, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. त्यानंतरही त्याच पद्धतीने २००८मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी बऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही. '''त्यांना १७ डिसेंबर २०१५ पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले''' १५ भारतीय अधिकरी व हजारएक अन्य लोक ४ सप्टेंबर २०१६ रोजी सेंट पीटर स्वेअरमध्ये संतपणाच्या मिसबलिदानात (??) सामील होते.
== सन्मान ==
* २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref>
==मदर तेरेसा यांच्यावरील पुस्तके==
* भारतरत्न मदर तेरेसा (रमेश तिरूखे)
* (दीन दु:खितांची विश्वमाता) मदर तेरेसा (शंकर कऱ्हाडे)
* (माणुसकीचा नंदादीप) मदर तेरेसा (शांताराम विसपुते)
* (विश्वमाता) मदर तेरेसा (सु.बा. भोसले)
==संदर्भ==
|