"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
 
==लक्षणे ==
सालमोनेलाचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून [https://marathidoctor.com/typhoid-in-marathi-typhoid-fever-in-marathi.html टायफॉइड] चे लक्षण दिसण्यास दहा ते चौदा दिवस लागतात. अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, वाटणे, डोकेदुखी चालू होणे, बारीक थंडी वाजून ताप येणे, मळमळणे, उलट्या होणे, मलावरोध, सांधेदुखी, पोटात मुरडा होणे, कळ लागणे, रक्तमिश्रित जुलाब होणे ही काही लक्षणे आहेत. भक्षक पेशीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या पेशीमधील सालमोनेला जिवाणू रक्तामधून पसरल्यानंतर त्यांच्या प्रभावाने ताप येण्यास प्रारंभ होतो. रक्तामधील मोठ्या संख्येने असलेल्या सालमोनेला जिवाणूमुळे आलेला ताप वाढत जातो. उपचार न घेतलेल्या रुग्णामध्ये अशी स्थिति चार ते आठ आठवडे राहते. टायफॉइडचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे छातीवर व पोटावर लालसर पुरळ येणे हे होय..
 
रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील सालमोनेलामुळे लहान आतड्यास छिद्र पडू शकते. असे झाल्यास लहान आतड्यातील अन्न आणि द्रव उदरपोकळीत शिरल्यास उदर पोकळी आंतरावरण दाह आणि शोथ होतो. हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणार्‍या मृत्यूचे कारण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले