"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७७:
शहाजी भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन राजांनी विपूल नाट्यलेखन केलं. बहूतेक सर्व नाटकांचे विषय देव-देवतांच्या विवाहांचे होते. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण. श्रीकोर्वंजी ही त्यातली काही महत्त्वाची नाटकं होत.या नाटकांनी इतिहास घडविला.
१८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावरवर वर्चस्व मिळवले आणि भोसले घराण्याची राजसत्ता गेली. त्यानंतर तिथे फारसे नाट्यलेखन वा सादरीरकण झाले नाही. तंजावरी नाटकांचा प्रवाह हा तिथेच लुप्त झाला. त्याचा शोध नंतर विसाव्या शतकात लागला. ज्येष्ठ इतिहासकार वि. का. राजवाडे ह्यांना एका रामदासी मठात तंजावरी नाटकांची बाडे सापडली. तंजावरी नाटकांमधील पदांचे नाते संस्कृत नाट्य परंपरेतील धृवांशी सांगता येते. तंजावरी परंपरेत त्यांना दरू असे संबोधत असत.
महाराष्ट्र आणि तंजावर ह्यांच्यात भौगोलिक अंतर असल्यामुळे तेथील नाटकांचा महाराष्ट्रातील नाटकांवर कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. नृत्यातून थोड्या प्रमाणात ह्या परंपरेचा पुन्हा उदय झालेला असला तरी मराठी नाटकांशी त्याची कुठल्याही प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. अशी ही मराठी नाटकाची आद्य परंपरा नाटकाच्या इतिहासात एखाद्या बेटाप्रमाणे मराठी नाटकापासून आपलं वेगळं असं अस्तित्व राखून आहे.मराठी नाटकाची आद्यपरंपरा सर्वंकष आहे.
 
== हे सुद्धा पहा ==