"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७३:
मराठी नाटकांच्या एका महत्त्वाच्या प्रवाहाचा उल्लेख करायलाच पाहिजे. महाराष्ट्रापेक्षा लांब, तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली आणि सादरही झाली..
त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावी लागतील.
तंजावरातील भोसले घराण्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नाट्यलेखन केलं. स्थानिक थेरूकुतू, भागवतमेळ्यासारख्या लोकनाटकांचा त्याच्या सादरीकरणावर बराच प्रभाव होता, तर लिखाण नाट्यशास्त्र परंपरेत उल्लेख केल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न होता..
नाटकांत नृत्य-संगीताचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जात असे. संगीत वृंद गायन-वादन करीत असे, सूत्रधार हा गद्यात भाषण करीत असे तर नट मुख्यत्वेकरून गायल्या जाणाऱ्या पदांवर नृत्य करीत असत, एका अर्थाने ते नट कमी आणि नर्तक अधिक असत. त्या नाटकांनाही नृत्य-नाट्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. नाटकांची कथानके बव्हंशी धार्मिक असत. नाटकांचे प्रयोग राजदरबारात सादर होत असत आणि दरबारातील मानकरी, सरदार, उमराव हेच बहुधा प्रेक्षक असत. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरूषच करीत असत आणि नाटकातल्या प्रस्तावनेतला सूत्रधार आणि कंचुकी नामक विदुषकाचा संवाद बऱ्याचदा अश्लील असे.
शहाजी भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन राजांनी विपूल नाट्यलेखन केलं. बहूतेक सर्व नाटकांचे विषय देव-देवतांच्या विवाहांचे होते. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण. श्रीकोर्वंजी ही त्यातली काही महत्त्वाची नाटकं होत.
 
== हे सुद्धा पहा ==