"गोवा राज्य स्थापना दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ===== स्थापना ===== ३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्...
(काही फरक नाही)

०९:५६, ३० मे २०२० ची आवृत्ती

स्थापना

३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. [१]

  1. ^ दैनिक, पुढारी (३० मे २०१०). "जिज्ञासा". २१३: ६.