"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५:
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नान्देड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केन्द्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास सन्तांची भूमी म्हटले जाते.
 
==इतिहास==
==इतिहास=मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील शिन्दखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते. ४०० वर्षे याच मराठवाड्यातील देवगिरीवरून यादवांनी विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले.मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते.
 
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे माण्डलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|title=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातन्त्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ|स्वामी रामानन्दतिर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेम्बर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेम्बर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई|मुम्बई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले