"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५०:
पारायणात वाचन असतं, प्रवचनाच वाचनासोबत थोडं समजावून सांगीतलं जातं, तर किर्तनात समजावून सांगणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतं की त्यासाठी संगीत आणि अभिनय हे घटक वापरले जातात. किर्तनातील गेय काव्य आणि त्याचं गद्य निरूपण ह्यात विष्णूदासांच्या नाटकाचं मूळ आढळतं, शिवाय होनाजी बाळांच्या शाहिरी काव्याचा विष्णूदासांना परिचय होताच. त्यामुळे हे सगळे प्रभाव विष्णूदासी नाटकांवर दिसून येतात.
भारत त्या काळात एक ब्रिटिश वसाहत असल्यामुळे अनेक ब्रिटिश सैनिक अधिकारी भारतात रहात होते. त्यांच्या मनोरंजनासाठी तत्कालिन ब्रिटिश नाटक मंडळ्या भारतात येऊन प्रयोग सादर करत असत. त्यातील काही नाटके शेक्सपिअरची तर काही तत्कालीन ब्रिटिश नाटककारांची होती. त्यांची मंचनाची पद्धत मात्र शेक्सपिअरन कालीन नसून त्याच काळातली असल्यामुळे ही नाटके कमानी मंचाच्या पद्धतीची होती.ह्या नाटकांचे प्रयोग होण्याकरिता ब्रिटिशांनी भारतात काही कमानी-मंच नाटकघरे उभारली. ही नाटके पहायला ब्रिटिश अधीकाऱ्यांसोबतच प्रतिष्ठित धनिक तसेच ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्या भारतीयांना आमंत्रण असे. अशा प्रकारे त्या काळात युरोपात ज्या पद्धतीने नाटक सादर होत असे, त्या पद्धतीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पश्चिम भारतात पारशी नाटकांचा उदय झाला. व्यापारी, उद्योजक पारशी समाज यांच्याकडून ह्या नाटकांना अर्थसहाय्य होत असल्यामुळे त्यांना पारशी नाटके असे म्हणत असत. गुजराथी तसेच हिंदुस्थानी भाषांमधून ती नाटके सादर होत असत. सादरीकरणाच्या पद्धतीवर युरोपीय प्रभाव होता, पण त्यांची कथानके मात्र भारतीय पुराणे, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारीक कथा आणि शेक्सपिअरची नाटके ह्यांच्यावर आधारित अशी होती. ह्या नाटकांमधले संगीत आणि नृत्य हे एकोणिसाव्या शतकातल्या तवायफ परंपरेतील होते. पारशी नाटकांचे प्रयोग लाहोर, आग्रा, लखनौ तसेच मुंबई येथे होत असत. बहुतेक सर्व प्रयोग ब्रिटिशांनी बांधलेल्या कमानी-मंच पद्धतीच्या नाटकघरांमध्येच होत असत.
 
== नाटक परंपरा ==