"कवठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
→‎कवठ: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
[[चित्र:कवठ.jpg|चौकट|कवठ]]
कवठ - शास्त्रीय नाव फेरोनिया एलेफंटएलेफंटम् व लिमोनीया अॅसीडिस्सीमा, रुटेसी कुळ. [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शब्द - वूड एप्पल, कर्ड फ्रूट, मंकी फ्रुट, [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] - कपित्थ, दधिफल, कपिप्रिय, मराठी - कपित्थ, कवंठ, कवंठी, कवठ इ. कवठ हे वृक्ष मूळचे [[दक्षिण दिशा|दक्षिण]] [[भारत|भारतातले]]. कवठ हे काटेरी व पानझडी प्रकारचे वृक्ष आहे. भारतासहित पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात.
या झाडाची उंची ६-९ मि. इतकी असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. या झाडाच्या खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कवठ" पासून हुडकले