"सखा कलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
मजकूर व्यवस्थित बसवला
ओळ १:
सखा कलाल
सखा कलाल (जन्म : रायबाग-जिल्हा बेळगांव, १० डिसेंबर १९३८; मृत्यू : कोल्हापूर, १३ डिसेंबर २०१९) हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.
 
पूर्ण नाव: सखाराम कलाल
 
(जन्म : १० डिसेंबर १९३८; जन्म ठिकाण:रायबाग(जिल्हा- बेळगांव)
 
मृत्यू : १३ डिसेंबर २०१९, कोल्हापूर
 
सखा कलाल (जन्म : रायबाग-जिल्हा बेळगांव, १० डिसेंबर १९३८; मृत्यू : कोल्हापूर, १३ डिसेंबर २०१९) हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.
 
सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून [[श्री.पु. भागवत]]ांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. [[वि.स. खांडेकर]] आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/सखा_कलाल" पासून हुडकले