"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: https://marathi.pratilipi.com/read/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0
छो Reverted 2 edits by 49.35.69.45 (talk) to last revision by 157.33.14.198 (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ २:
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायर्‍या चढून येथे पोहोचता येते.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref> या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी तावरे पाटील यांच्या कडून जमीन घेऊन वदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | title = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref> टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.
 
पार्वतीवर एक प्रमुख मोठे व तीन लहान मंदिरे आहेत .मुख्य मंदिर ई.स.२३ एप्रिल १७४९ मध्ये तिसरे पेशवे श्रीमंत नाना साहेब यांनी बांधले. त्यांच्या आई काशीबाई साहेब यांच्या पायाला आवाळू झाले होते. पर्वतीचे पाटील नवलोजी तावरे पाटील यांना देवीने दृष्टांत दिल्यामुळे तावरे पाटील यांनी निवडुंगाच्या बनात सापडलेल्या देवीच्या मूर्तीची पर्वतीवर एका लहानशा मांडवात स्थापना केली होती.त्यांच्या आईचा गंभीर आजार देवीच्या आशीर्वादाने बरा झाला .
 
हे तळ्यातील गणपतीच्या दर्शनास आलेल्या काशीबाईंना त्यांच्या कारभाऱ्याकडून कळले. त्यांनाही देवीची प्रचीती आल्यामुळे त्यांनी नानासाहेबांकडे देवीचे देऊळ बांधण्याची इच्छा प्रकट केली. या इच्छेनुसार नानासाहेबांनी पर्वतीवर पर्वताई देवीचे मंदिर बांधले. पर्वतीवर जाण्याकरीता चिरेबंदी दगडांच्या एकशे तीन पायऱ्या, दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बांधण्यात आल्या. आपल्या येथे उपलब्ध असलेला काळ्या बेसाल्टच्या दगडा मधील या पायऱ्या हे मराठा काळातील
 
घडीव दगडी बांधकामाचे सुरेख उदाहरण आहे. गेले दोनशे हून जास्त वर्षे ऊन , वारा आणि पाऊस यांना तोंड देत या पायऱ्या वापरात आहेत. यांची रुंदी एक हत्ती
 
सहजपणे मंदिराकडे चालत चढत जाऊ शकेल अश्या आहेत.पूर्वी या पायऱ्या आजच्या पायथ्याच्या पुरंदरे वाड्यापाशी संपत असत .
 
प्रिंस ऑफ वेल्स पुण्यात आला असताना त्याचा हत्ती पाय घसरून पडल्यानंतर याचा वापर हत्तीवरून जाण्यास बंद झाला.
 
<br />
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय [[कार्तिकेय]], [[विष्णू]], [[विठ्ठल]]-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. [[पानिपताची तिसरी लढाई|पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील]] मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले<ref name="मश्रीदीक्षित"/>.मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्‍यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. इ स १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसर्‍या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.
Line २२ ⟶ ११:
==पर्वतीसंबंधी पुस्तके==
* पुण्याची पर्वती ([[प्र.के. घाणेकर]])
*
 
==संदर्भ==
Line २९ ⟶ १७:
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.parvatidarshan.in/ | title = आधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
*https://marathi.pratilipi.com/read/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-ww24o1qu0knz-n52l757n7711a95
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले