"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दिवाळी मराठी निबंध
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५४:
 
===मराठीतील निबंधांचा इतिहास===
मराठीमध्ये निबंधलेखनाचीनिबंधलेhiiiखनाची सुरुवात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीपासून झाली. [[बाळशास्त्री जांभेकर]], भाऊ महाजन, [[गोपाळ हरी देशमुख|लोकहितवादी]], [[महादेव गोविंद रानडे]], महादेव मोरेश्वर कुंटे, [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]], स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, [[जोतीराव गोविंदराव फुले|जोतीराव फुले]], विष्णु परशुरामशास्त्री पंडित हे या पिढीतील काही निबंधकार होत. मराठी निबंधवाङ्‌मयाची मांडणी प्रथम मुख्यत: मराठी नियतकालिकांत सुरू झाली<ref name="मराठी विश्वकोश" />. १८३२ साली जांभेकरांनी 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. यातून त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल विचार मांडण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी अनेक लेख लिहिले. १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' हे साप्ताहिक काढले. लोकहितवादींची गाजलेली शतपत्रे ही याच साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीमध्ये वेगवेगळी नियतकालिके सुरु झाली. या नियतकालिकांमधील लेख, स्फुटे, बातम्या आणि वाचकांची पत्रे, यांमधून मराठीत निबंध या लेखनप्रकाराची पायाभरणी झाली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधांचा वापर जनजागृतीसाठी केला गेला.
 
मराठी निबंध पाच टप्प्यांतून प्रकटत गेला आहे: (१) १८७०पूर्वीचा प्राथमिक निबंध, (२) चिपळूणकरी वळणाचा निबंध, (३) परांजपे वळणेाचा ललितगुणयुक्त निबंध (४) केळकरी वळणाचा प्रसन्न शैलीचा ललितगुणयुक्त निबंध आणि (५) लघुनिबंध.
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले