"ऋणशब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख "ऋृणशब्द"
 
दुवे जोडले
ओळ १:
'''ऋृणशब्द''' म्हणजे असे शब्द जे एका भाषेमधून (देणारी भाषा) दुसऱ्या भाषेमधे किंवा इतर भाषांमधे (स्विकारणारी भाषा), कोणत्याही भाषांतराशिवाय, वापरले जातात. प्रत्येक वेळेस देणारी भाषा ही मुळ भाषा असायलाच हवी असे काही नाही, मध्यस्ती करणाऱ्या भाषेतून सुध्दा शब्द घेतले जातात. जसे की अनेक भारतीय शब्द [[पारशी|पारसी]][[अरबी भाषा|अरबी भाषांच्या]] माध्यमातून इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये वापरले आहेत.
 
== उदाहरणे ==
परकीयांनी भारतावर केलेली आक्रमणे व काही शतके केलेल्या राज्यामुळे अनेक शब्द अरबीतून, इंग्रजीतून मराठी किंवा हिंदी भाषेत वापरलेले आहेत. तसेच अनेक शब्द मराठी किंवा हिंदीतून इंग्रजीत वापरे आहेत. खास करून सर्वत्र प्रसिध्द झालेल्या अन्नपदार्थाच्या संदर्भातील शब्द, जसे की "''[[गरम मसाला]]'' ''(Garam Masala)'', ''[[चटणी]]'' ''(Chutney)''" हे शब्द इंग्रजीत सर्रासपणे वापरले जातात. नवीन जोडलेला शब्द म्हणजे "''पक्का'' ''(Pukka)''", जो स्वयंपाकाबाबत वापरला जातो.
 
== भारतीय भाषांमधून अन्य भाषांमध्ये ==
[[ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी|ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्श्नरीने]] एक नोंद केलेली आढळते की सर्वात जुना ऋृणशब्द "''qila"'' हा शब्द मराठीतील "''[[दुर्ग|किल्ला]]'' " किंवा हिंदीतील "''किला'' " या शब्दापासून इंग्रजीत वापरला गेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋणशब्द" पासून हुडकले