"गजेंद्र चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय अभिनेता
Content deleted Content added
→‎वैयक्तिक जीवन: लेख निर्माण
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१५:४८, १३ मे २०२० ची आवृत्ती

गजेंद्रसिंह चौहान (जन्म १० ऑक्टोबर १९५६), ज्यांना व्यावसायिकपणे गजेंद्र चौहान म्हणून ओळखले जाते, ते भारतीय दूरदर्शनवरील कामांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते आहेत, विशेषत: महाभारत (१९८८-१९९०) या ऐतिहासिक दूरचित्रवाणी मालिकेतील युधिष्ठिराचे व्यक्तिचित्रण. काही ब चित्रपटांमध्येही त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, आणि इतर चित्रपटांमध्ये मोठ्या संख्येने कनिष्ठ भूमिका होत्या. २०१५ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (भाचिदूसं) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले, ज्याने भाचिदूसंच्या विद्यार्थ्यांद्वारे वाद आणि विरोधाभास निर्माण झाला, ज्यामुळे ऑक्टोबर २०११ मध्ये त्यांनी राजिनामा दिला.

गजेंद्र चौहान
२०१० मध्ये चौहान
जन्म १० ऑक्टोबर, १९५६ (1956-10-10) (वय: ६७)
दिल्ली, भारत
इतर नावे गजेंद्रसिंह चौहान
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारत
कारकीर्दीचा काळ १९८४-वर्तमान
धर्म हिंदू

वैयक्तिक जीवन

चौहान यांचा जन्म दिल्लीत झाला.[१] अभिनयात काराकिर्द करण्यासाठी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स) विकिरण चित्रणमध्ये पदवी मिळवली.[२] तेथे ते रोशन तनेजा संचालित महाविद्यालयात अभिनय शिकले, ज्याने आधी भाचिदूसंमध्ये शिकविले होते.[३]

अभिनय कार्यकाळ

चौहान यांच्या अभिनय कारकीर्दीचे वय ३७ वर्षे आहे, आणि स्वत:च्या गणनेनुसार, त्यांनी या काळात ६०० दूरचित्रवाणी मालिका आणि जवळपास १५० चित्रपटांत काम केले आहे.[४][५] अभिनेता म्हणून त्यांची पहिली भुमिका १९८३ मध्ये पेइंग गेस्ट या दूरचित्रवाणी मालिकेत होती आणि ते रजनी, एअर होस्टेस आणि अदालत यासारख्या कार्यक्रमांमध्ये काम करत गेले.[६] १९८६ मध्ये त्यांनी मैं चूप नहीं रहोंगीमध्ये केलेला अभिनय हा पहिला चित्रपट अभिनय होता.[३] त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेताना , द टाईम्स ऑफ इंडिया आणि फर्स्टपोस्ट यांनी लिहिले की, त्यांनी काही “क श्रेणी” चित्रपटांमध्ये केवळ महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत, त्यांच्या इतर बहुतेक भूमिका कनिष्ठ होत्या, त्यातील थोड्या मुख्य प्रवाह चित्रपटातील होत्या.[७][८]

महाभारत

साचा:आणखी सुरुवातीला चौहान यांना दूरचित्रवाणी मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली होती, आणि या भूमिकेत त्यांनी मालिकेचे दोन भाग चित्रित केले.[९] तथापि पहिल्या मालिकेचे चित्रीकरण लांबणीवर पडले आणि चौहान नवीन कार्य करण्यासाठी दक्षिणेकडे गेले.[९] परत आल्यावर, चौहानने वजन कमी केले होते आणि ते कृष्णाच्या भूमिकेसाठी अयोग्य मानले गेले. नंतर त्यांना युधिष्ठिरच्या भूमिकेची संधी देण्यात आली,ज्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले आहेत.[९]

प्रशासन व राजकारण

चौहान २० वर्षे चित्रपट व दूरचित्रवाणी कलाकार संघटनेच्या कारभारातही कार्यरत राहिले आणि वर्षभर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.[४][१०] २००४ मध्ये चौहान यांनी राजकारणात प्रवेश केला,[५] आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाले, ज्यासाठी त्यांनी राष्ट्रीय सांस्कृतिक संयोजक म्हणून काम केले.[४][११]

भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेचे अध्यक्ष

साचा:आणखी ९ जून २०१५ रोजी, चौहान यांची भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेचे (भाचिदूसं) अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.[१२] विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांमुळे की हा "संस्थेचे भगवेकरण" करण्याचा निर्लज्ज प्रयत्न होता, त्यांची नियुक्ती ही विवादास्पद असल्याचे सिद्ध झाले.[१२] अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (अभाविसं), (भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) मुक्तीसंग्रामची विद्यार्थी संघटना ) यासह डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा एक विभाग आंदोलन चालू ठेवले.[१३] चौहान यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक वर्ष देण्याची विनंती केली, आणि ते आधीच्या अध्यक्षांपेक्षा चांगले होतील असा आग्रह धरला.[१४]

चौहान यांच्या भाचिदूसंच्या अध्यक्षपदी नियुक्तीला पाठिंबा देणार्यांमध्ये भाजप समर्थक आणि राजकारणी आहेत,ज्यामध्ये मुकेश खन्ना,[१५] शत्रुघ्न सिन्हा, परेश रावळ, हेमा मालिनी, [[राज्यवर्धनसिंग राठोड|राज्यवर्धनसिंह राठोड]‌] आणि पेंटल यांचा समावेश आहे.[१०][१६][१७] भाचिदूसंचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक, अभिनेते, चित्रपट तंत्रज्ञ, चित्रपट निर्माते आणि राजकीय नेते यांच्यासह अनेकांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे, त्यामध्ये रणबीर कपूर, कल्की केकला, नवाजुद्दीन सिद्दिकी, अनुपम खेर, पियुष मिश्रा, आनंद पटवर्धन, किरण राव, जाह्नू बरुआ, सलमान खान, ऋषी कपूर,[१८][१९][२०] रेसुल पुकुट्टी,[२१] राजकुमार राव, अमोल पालेकर,[२२] सौमित्र चटर्जी,[२३] राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे.[२४]

चित्रपटावली

चित्रपट

वर्ष शीर्षक भुमिका
१९८५ मैं चुप नही रहुंगी
लल्लु राम उप निरिक्षक
१९८६ जंगल लव
१९८९ खुली खिडकी अविनाश
आवारा जिंदगी
१९९१ वासना
डांसर जोशी
जंगलकी राणी
नागमणी
१९९२ जंगलका बेटा
जवानी जानेमन
दिलवाले कभी ना हारे शिबू
१९९३ मुलाकात बलराज
१९९४ वतन
जय मा वैष्णोदेवी
पथरीला रास्ता
जनमसे पहले
वादे इरादे
मोहिनी गंधर्व
सोनेकी सिता
आओ प्यार करे सुर्य
१९९५ हम सब चोर हैं पोलीस आयुक्त
काला सच
रेश्मा
१९९६ हिम्मतवर निरिक्षक पाटील
१९९७ उफ! ये मोहब्बत उमंग उसगावकर
विश्वविधाता मुकेश माथूर
राजाकी आयेगी बारात प्रताप
धर्म कर्म पोलीस निरिक्षक
पोलीस स्टेशन
भयानक पंजा
१९९९ इंटरनॅशनल खिलाडी राहुलचे पिता
इंतेकाम औरतका
होगी प्यारकी जीत अर्जुनसिंह
दिलका सौदा
२००० बिल्ला नं. ७८६ वीरेंद्रसिंह (पिंकीचे पिता)
आजका रावण अपोआ राठोड
तपिश
सामरी
ये है प्रेम जंजाल
२००१ रुपा राणी रामकली
गुमनाम है कोई विनोद कुमार त्रिपाठी
अर्जुन देवा वीरेंद्र चौधरी
२००२ तुमको ना भुल पायेंगे माजी सैनिक
२००३ अंदाज सहाय
पर‌वाना गणेशोत्सव नर्तक/गायक
बागबान वाहन विक्रेता
२००४ पतच हो तो ऐसा
२००५ धडकने र‌वी मल्होत्रा
बरसात अरवचा पिता
२००६ मेरे जीवन साथी
२००७ मेरी डोली तेरे अंगणा महेंद्र
२०१० इसी लाईफमे नरेशचंद
२०१२ नक्षत्र शर्मा
२०१३ महाभारत और बर्बरिक युधिष्ठिर
२०१४ कही है मेरा प्यार प्रियाचा पिता

दूरचित्रवाणी

वर्ष शीर्षक भुमिका टिपा
१९८५ सरकार: रिश्तोकी अनकही कहानी
१९८८ महाभारत युधिष्ठिर २ ऑक्टोबर १९८८-२४ जुन १९९० मध्ये ९४ भाग
१९९३ कानून चंद्र सक्सेना १४ भाग
१९९४ द झी हॉरर शो
२००० नूर जहा
२००१ आनेवाला पल
२००१ रामायण (२००१ मालिका) दशरथ
२००६ रावण दशरथ
२००८-२००९ नागिण नागदेव
२०१२ शोभा सोमनाथकी
२०१२ क्या हुआ तेरा वादा चोप्रा
२०१३ अदालत देसाई
२०१७ संकटमोचन महाबली हनुमान सुमंत

संदर्भ

  1. ^ "गजेंद्र चौहान जीवनचरित्र". www.filmcentro.com. Filmcentro - Actors & Actress profile. 12 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "गजेंद्र चौहानकडे राजकीय प्रभाव आहे, पण अभिनय प्रभाव नाही". business-standard.com. Business Standard. 20 June 2015. 13 July 2015 रोजी पाहिले.
  3. ^ a b घोष, परामिता (20 June 2015). "३ इडियट्स हा माझा आवडता चित्रपट आहे: गजेंद्र चौहान,भाचिदूसं अध्यक्ष". hindustantimes.com. Hundustan Times. 12 July 2015 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "'मला वाटत नाही की माझा कार्यकाळ वाईट आहे...मला प्रयत्न करू द्या,' गजेंद्र चौहान म्हणतात". The Indian Express. 18 June 2015.
  5. ^ a b "मी आता ६०० मालिका वयस्क झालो आहे: गजेंद्र चौहान". The Times of India.
  6. ^ "'सामान्य व्यक्तीला मोठे पद मिळणे कोणालाही मान्य नाही'". The Telegraph. 21 June 2015. 6 August 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "गजेंद्र चौहान: क-श्रेणीतील ३४ वर्षापासून सक्रीय सहकलाकार पिळवणुक करतो", Times of India, 11 July 2015, 13 July 2015 रोजी पाहिले
  8. ^ रामकृष्णन, श्वेता (17 June 2015). "अविस्मरणीय भुमिकांचा कार्यकाळ: ही आहे भाचिदूसं अध्यक्ष गजेंद्र चौहानची चित्रपटयादी". Firstpost.
  9. ^ a b c शर्मा, सुरुची (6 February 2012). "I'm 600 series old now: Gajendra Chauhan". timesofindia.com. The Times of India. 12 July 2015 रोजी पाहिले.
  10. ^ a b "'होय, मी प्रौढ चित्रपट केले आहेत. पण कोणीही माझ्या चांगल्या चित्रपटांबद्दल बोलत नाही'". rediff.com. Rediff Movies. 30 June 2015. 12 July 2015 रोजी पाहिले.
  11. ^ "कलाकार भाजप सदस्य गजेंद्र चौहानच्या अध्यक्षता नियुक्तीनंतर पुणे येथे चित्रपट संस्थेत आंदोलन". ndtv.com. NDTV. 13 June 2015. 12 July 2015 रोजी पाहिले.
  12. ^ a b जोशी, योगेश (13 June 2015). "महाभारत अभिनेत्याच्या भाचिदूसं अध्यक्षतेने विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडवला". hindustantimes.com. Hindustan Times. 12 July 2015 रोजी पाहिले.
  13. ^ ANI (16 June 2015). "AISA protests against Gajendra Chauhan's appointment as FTII chief". business-standard.com. Business Standard. 12 July 2015 रोजी पाहिले.
  14. ^ कुमार, अनिज (18 June 2015). "मी स्वनिर्मित व्यक्ती आहे". thehindu.com. The Hundu. 12 July 2015 रोजी पाहिले.
  15. ^ http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Students-willing-for-talks-ministry-still-backs-choice/articleshow/48011905.cms
  16. ^ "राज्यवर्धनसिंह राठोड यांनी गजेंद्र चौहानच्या भाचिदूसं अध्यक्षता निवडणुकीचे समर्थन केले". mid-day.com. Mid-Day. 11 July 2015. 12 July 2015 रोजी पाहिले.
  17. ^ PTI (10 July 2015). "गजेंद्र चौहान महाभिनेत्यांच्या आधी निवडलेले, कारण ते आणखी वेळ देऊ शकले असते". indianexpress.com. Indian Express. 12 July 2015 रोजी पाहिले.
  18. ^ "FTII row: Top Bollywood personalities join chorus against Gajendra Chauhan". indiatoday.com. India Today. 9 July 2015. 12 July 2015 रोजी पाहिले.
  19. ^ Venugopal, Vasudha (11 July 2015). "Amitabh Bachchan could've been FTII chairman, but Modi govt ignored I&B list and selected Gajendra Chauhan". economictimes.com. The Economic Times. 12 July 2015 रोजी पाहिले.
  20. ^ "It is nothing to be happy or dissatisfied about: Jahnu Barua on Gajendra Chauhan's appointment as FTII chairman". ibnlive.com. IBN Live. 14 June 2015. 12 July 2015 रोजी पाहिले.
  21. ^ "Resul Pookutty on FTII Controversy: Gajendra Chauhan Cannot Inspire Students". NDTV. 2 July 2015. 6 August 2015 रोजी पाहिले.
  22. ^ "Rajkummar Rao, Amol Palekar demand Chauhan's removal". Business Standard. 11 July 2015. 6 August 2015 रोजी पाहिले.
  23. ^ "'Gajendra Chauhan Who?': Veteran Actor Soumitra Chatterjee Backs FTII Protests". NDTV. 3 August 2015. 6 August 2015 रोजी पाहिले.
  24. ^ "After Salman Khan and Rahul Gandhi, Arvind Kejriwal speaks up against Gajendra Chauhan". DNA. 5 August 2015. 6 August 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे