"मटका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
असलेला लेख
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन
इतरत्र सापडलेला मजकूर
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
'''मटका''' हा [[जुगार|जुगाराचा]] एक प्रकार आहे.
#पुनर्निर्देशन [[जुगार#मटका]]
 
==संयोजक==
 
आद्य मटका किंग कल्याणजी भगत याचा जन्म कच्छमधील रटाडिया-गणेशवाला गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबाचे आडनाव गाला होते, आणि त्यांच्या धार्मिक वृत्तीसाठी त्यांना कच्छच्या राजाने भगत ही उपाधी दिली होती. हा कल्याणजी भगत मुंबईत सन १९४१मध्ये आला आणि त्याने शहरभर फिरून हातगाडीवरून कच्छचे मसाले विकायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मुंबईच्या वरळी भागात किराणा मालाचे एक दुकान काढले. हा व्यवसाय चालू असतानाच त्याने 'मटका' नावाचा जुगाराचा एक प्रकार सन १९६० साली सुरू केला. मटक्याचे आकडे न्यूयाॅर्कच्या ठोक कापूस बाजारात बाजार उघडायच्या (ओपन)आणि बंद व्हायच्या (क्लोज) भावांच्या शेवटचे अंक असत. कल्याणजी भगत लोकांकडून न्यूयाॅर्क काॅटनच्या भावावर लावलेले पैसे घॆई, आणि ज्यांचे ओपन-क्लोज अंक बरोबर येत त्यांना लावलेल्या पैशाचे नऊपट पैसे देई. हे बेटिंग घ्यायचे आणि पैसे देण्याचे व्यवहार कल्याणजी राहात होता त्या वरळीमधल्या विनोद महल नावाच्या इमारतीच्या प्रांगणात होत असत. न्यूयाॅर्कचे काॅटन मार्केटचे भाव लोकांना घरबसल्या समजू लागल्याने १९६२ साली कल्याणजीने वरळी मटका सुरू केला. यावेळी ओपन-क्लोजचे अंक एका मटक्यात (मडक्यात) ठेवलेल्या आणि लॊकांसमक्ष निवडलेल्या चिठ्ठ्यांवर ठरू लागले. हा मटका खूप लोकप्रिय झाला. मुंबईत भरभरभराटीत असलेल्या कापड गिरण्यांच्या आवारांत कल्याणजीचे एजंट बेटिंग घेत आणि संध्याकाळी कल्याणजीद्वारा आकडे फुटले की ग्राहकांना पैसे देत. काही विशिष्ट आकड्यांवर फार मोठी रक्कम लावली असल्याचे लक्षात आले तर हे एजंट त्यांतले काही पैसे मोठ्या बुकीकडे लावत म्हणजे हे आकडे खरोखरच लागले तर त्यांची गिऱ्हाइकांना पेमेन्ट करण्यासाठी त्या मोठ्या बुकीकडून मिळालेल्या पैशातून हे शक्य होई. मध्य मुंबईत शेकडो दुकानांतून कल्याणजीचे एजंट बुकिंगचे काम करू लागले. १९६० ते १९८०च्या दरम्यान कल्याणजीच्या वरळी मटक्याचचे आर्थिक व्यवहार महिना ५०० रुपयांच्या घरात गेले.
 
मटक्या अड्ड्यांवर मुंबई पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात धाडी पडल्या आणि मटक्याचा हा धंदा मुंबईबाहेर गुजराथेत आणि राजस्थानात गेला. मुंबईत ऑनलाईन बेटिंग, झटपट लाॅटरीसारखे अन्य रूपात मटका खेळला जाऊ लागला. मटक्यामुळे श्रीमंत झालेले पंटर क्रिकेट मॅचेसवर बेटिंग करू लागले. मटक्याच्या धंद्याला उतरती कळा लागली आणि हे व्यवहार ५०० कोटी रुपयांवरून महिना १०० कोटी रुपयांपर्यंत घसरले. १९९५ सालापर्यंत मुंबईत असलेल्या बुकींची संख्या २,००० वरून ३००वर आली.
 
कल्याणजीच्या मृत्यूनंतर त्याची मुलगा सुरेश भगत आणि त्याची १९७९ साली लग्न करून आलेली पत्नी जया हा व्यवहार सांभाळू लागली.
 
११ जून २००८ रोजी महिंद्र कंपनीच्या स्काॅर्पियोतून प्रवास करणाऱ्या सुरेश भगत आणि सहा इतर जणांच्या कारला एका ट्रकने धडक दिली आणि त्या अपघातात सुरेश भगत आणि सहाजण, त्यांच्या वकिलां-शरीरसंरक्षकांसह ठार झाले. त्यावेळी ही पार्टी अलिबाग कोर्टातून मुंबईला परतत होती. पुढे असे समजले की, हा अपघात सुरेश भगतचा मुलगा हिरेश भगत आणि त्याची आई जया भगत यांनी घडवून आणला होता. हिरेश भगत आणि जया भगत यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
 
कल्याण भगतचा एकेकाळचा सहकारी रतन खत्री याने सन १९६०साली मुंबईतील मुंबादेवी भागातील धनजी स्ट्रीटवरून मटक्याचा व्यवसाय करायला सुरुवात केली. त्याचा मटका देशातल्या देशांत आणि परदेशांतही पसरला होता. त्याचे एजंट म्हणून काम करणारे कित्येक लाख पंटर होते.त्यामुळे आर्थिक व्यवहार हजारो कोटी रुपयांपर्यंत पोचला होता. न्यूयाॅर्कच्या पाच दिवसाच्या आठवड्यामुळे रतन खत्रीचा मटका आठवड्यातून पाचच दिवस चाले (कल्याणजीचा सातही दिवस होता!) त्यामुळे न्यूयाॅर्क काॅटनच्या भावांवर आधारलेला मटका बंद करावा लागला. आपल्या मित्रांच्या सल्ल्यावरून रतन खत्रीने दिवसातून दोनदा तीन कार्डे काढायचा मटका सुरू केला. हे आकडे मटक्यातून प्रेक्षकांच्या उपस्थितीत काढले जात असल्याने विश्वसनीय असत. हा तीन अंकी मटक्यात जिंकणाऱ्याला लावलेल्या पैशाच्या नऊपट ते ९९पट पैसे मिळत. त्यामुळे हा मटका फारच लोकप्रिय झाला, आणि रतन खत्री हा थोड्याच काळात मटका किंग म्हणून कुख्यात झाला.
 
भारतावर [[इंदिरा गांधी]] यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर रतन खत्रीला १९ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला. जेलमधून सुटल्यावर रतन खत्रीने मटका बंद केला. धंद्यातून निवृत्ती घेतलेला रतन खत्री ताडदेवला शांतपणे आपले आयुष्य व्यतीत करत होता.
 
अखेरीस वयाच्या ८८व्या वर्षी म्हणजे १० मे २०२० रोजी रतन खत्री याचे वृद्धत्वामुळे आणि दीर्घकाळच्या आजारपणामुळे निधन झाले.
 
== हे सुद्धा पहा ==
* जुगार
 
[[वर्ग:जुगार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मटका" पासून हुडकले