"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
'''यशवंत नारायण''' ऊर्फ '''अप्पा टिपणीस''' (०३[[३ डिसेंबर]], १८७६)[[इ.स. १८७६|१८७६]]:[[महाड ]],जि. [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - ([[२५ मार्च]], [[इ.स. १९४३|१९४३]], [[मुंबई]], महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. [[चंद्रग्रहण (नाटक)|चंद्रग्रहण]] या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्‍न केला.
 
ते मूळचे [[महाड]]चे राहणारे असून अप्पांचे वडील नारायणराव यांचे नेहेर (महाबळेश्वर) येथे किराणा मालाचे दुकान होते. त्यांची घरची परिस्थिती चांगली होती.
 
अप्पा टिपणिसांचे मोठे बंधू माधवराव टिपणीस एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी [[विष्णुपंत औंधकर]], [[केशवराव दाते]] इ. सह काम केले होते. अप्पा टिपणिसांना त्यांच्या बंधूंकडून अभिनयाचे धडे मिळाले.
 
अप्पांचे जन्मस्थळ कोकणातळे महाड असून त्यांचे बालपण तेथेच गेले. विद्यार्थी असताना त्यांनी काही मित्रांसह हौसेखातर काही नाटके केली.
 
शालेय जीवनात नाटके करतांकरतां एक [[नाट्यसंस्था]]च उभारण्याचा प्रयत्न केला.. [[ज्ञानप्रकाश]]चे काही काळ संपादक असलेले, आणि पुढे [[एलफिन्स्टन काॅलेज]]मध्ये प्राध्यापक झालेले गोविंदराव टिपणीस आणि मामा सुळे यांची त्यांनी मदत घेतली. गोविंदराव टिपणीस [[पुणे|पुण्याला]] गेले आणि त्यांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली. [[फर्गुसन काॅलेज|फर्ग्युसन काॅलेजात]] प्राध्यापक असलेले भानू यांचेही साहाय्य त्यांना मिळाले. या सर्वांनी सन १९०४मध्ये [[महाराष्ट्र नाटक कंपनी]]ची स्थापना केली. अप्पा टिपणीस या नाटक कंपनीचे चालक झाले.
 
या नाट्यसंस्थेने सुरुवातीलाच 'शाहू नगरवासींनी केलेले, आणि पुढे लेखकाशी मतभेद झाल्याने व अन्य काही कारणाने बंद केलेल्या, [[कृ.प. खाडिलकर]] यांच्या 'कांचनगडची मोहिनी' या नाटकाने सुरुवात केली. अप्पा टिपणीस नायकाच्या भूमिकेत होते आणि त्यांचे बंधू माधवराव मॊहिनेची भूमिका करत होते. या नाटकच्या तालमी चालू असताना [[गॊविंद बल्लाळ देवल]] तेथे आले, दोन अंकांपर्यंत ते कसेबसे तालीम पहायला बसले आणि उठून गेले. जाताना ते प्रा.भानूंना म्हणाले, 'उगाचच तुम्ही या मंडळींसाठी तुमचा वेळ फुकट दवडत आहांत. हे नाटक चालणे शक्य नाही.' त्यानंतर मुंबईला येऊन [[गोविंद बल्लाळ देवल|देवलांनी]] या नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला आणि ते म्हणाले, 'मी माझे पहिले मत परत घेतो. नटमंडळींनी प्रयोग फारच छान वसवला आहे.'{{संदर्भ हवा}} संस्थेचे 'कांचनगडची मोहना' खूप छान चालले.
 
महाराष्ट्र नाटक मंडळीने 'कमला' हे सामाजिक नाटक केले; तेही खूप नावाजले गेले. त्यावेळी अप्पा टिपणीस यांनी पुनर्विवाह केला होता. त्याबद्दल त्यांना एकाच वेळी लोकांच्या कौतुकाला आणि उपहासाला व टीकेला तोंड द्यावे लागले. त्यांचे 'संगीत प्रेमसंन्यास' हे तिसरे नाटक रंगभूमीवर आले, पण मंडळींच्या अंतर्गत भांडणांमुळे अप्पांना कंपनी सोडावी लागली.
 
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके==
Line ५१ ⟶ ६३:
{{DEFAULTSORT:टिपणीस, य.ना.}}
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग: इ.स. १८७६ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९४३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]