"औद्योगिक क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५८ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये अस्तित्वात होते. इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. इंग्लंडचे [[व्यापारी]] [[आशिया]] [[खंड]]ात दूरवर पोहोचले होते. [[भारत]]ात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने [[फ्रान्स]]चा पाडाव केला. त्याचप्रमाणे [[अमेरिका|अमेरिकेतील]] वसाहतींमधून इंग्लंडला आमाप नफा व लूट मिळाली होती. इंग्लडने वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली. या संपत्तीचा वापर इंग्लंडने आपल्या औद्योगिक विकासासाठी केला. [[ब्रुक ॲडम्स]] या [[इतिहासकार]]ाच्या मते ''भारताच्या भांडवलावर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची उभारणी झाली होती.''
 
याच सुमारास इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात [[वैज्ञानिक]] प्रगती सुरू झाली. इंग्लंडमध्ये उत्साही, धाडसी, कल्पक संशोधकांनी विविध शोध लावले. नविन यंत्रे तयार केली. उदारणार्थ, [[जेम्स वॅट]]ने [[बाष्पयंत्र]]ाचा शोध लावला, [[जॅार्ज स्टीफन्सन]]ने [[रेल्वे इंजिन]]ाचा शोध लावला. यांच्या शोधामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. इंग्लंडमध्ये घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीने संपूर्ण युरोप आणि आशिया खंडामध्ये परिवर्तनाला दिशा दिली औद्योगिक क्रांतीच्या परिणामस्वरूप वसाहतवादी स्पर्धा निर्माण झाली
 
==इंग्लंडमधील नैसर्गिक अनुकूलता==
२६७

संपादने