१२
संपादने
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) (चुकून टाकला गेलेला परिच्छेद) खूणपताका: आशय-बदल दृश्य संपादन |
छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |

== जनावरांचे चारा व्यवस्थापन ==
जनावरांच्या शरीरातील उर्जा वाढवयण्यासाठी,शरीराची वाढ, तंदुरुस्ती व स्वास्थ्यासाठी खाद्याची गरज असते. म्हणून खाद्यात पुरेशी उर्जा व शरीराला लागणारी प्रथिने,क्षार व आवश्यक असणारी पोषकतत्वे यांचा समावेश पाहिजे. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही घटकही आहारात असावे लागतात.

=== '''आवश्यक पशुखाद्य''' ===
* चारा- हिरवा व वाळलेला
* खुराक - यामध्ये कडधान्ये(मका, ज्वारी, बटाटा, टॅपी ओका) व कारखान्यातील उपउत्पादने(मळी, पेंड)
=== '''हिरवा चारा-''' ===
हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. हिरवा चारा जनावरांना चिवस्ट लागतात.
खुराकामध्ये अन्नघटक व उर्जा जास्त प्रमाणत असल्यामुळे याचा दुधावर चांगला परिणाम होतो.
पशुला खाद्य देताना खालील बाबीचा विचार करावा :
१) खाद्यातील पाण्याचा अंश किती आहे.
२) पचन होईल अशा खाद्यचा अंश:- चारा : ४०-५५%, पेंड :८०-९०% ,धान्य :७०-९०%
३) पौष्टिक गुण, आवश्यक असणारी पोषकतत्वे पहावे.
४) चव व स्वाद कि ज्यामुळे जनावरांना खाद्य आवडेल.
५) विशिष्ट प्रथिने,जीवनसत्वे इ. ने त्यांची प्रकृती सुधारेल /आरोग्य राखले जाईल.

=== '''वाळलेला(सुका) चारा-''' ===
डोंगराळ व वनांसाठी आरक्षित जागेमध्ये वाळलेले डोंगरी गवत, भाताचा पेंढा किंवा गव्हाचे काड कापून साठवून ठेवले जातात.
काही ठिकाणी कडबा साठवून ठेवला जातो. हे गवत मुखत्वे हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या सुरवातीला वापरण्यात येते. ह्या वाळलेल्या गवतात पोषकतत्वे कमी प्रमाणात असतात. अश्या चाऱ्याला युरिया, मिठ, मिनरल मिक्शर, व गुळ याची प्रक्रिया करून त्याचे पोषण मूल्य सुधारले जाऊ शकतात. ज्यामुळे जनावरांना ज्यावेळी हिरवा चार उपलब्ध नसेल अशावेळी पुरेसा पौष्टीक चारा मिळेल व चा-याची कमतरता भासणार नाही.
=== '''खुराक -''' ===
खुराकामध्ये ऊर्जा भरपुर प्रमाणात असते, म्हणून उत्पादन आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास ,हिरवी मका,गवत, उसाचे वाढे या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो ही खाद्ये जनावरांना खाण्यासाठी चिवस्ट लागतात.तसेच खुराकात म्हणजेच साखर काढल्यानंतरची मळी, तेल काढल्यानंतरची पेंड,भरडा यांमध्ये अन्नघटक (प्रथिने) व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात, यामुळे दुधाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होतो व दुधाच्या उत्पादनत वाढ होते. तसेच विशिष्ट प्रथिने,जीवनसत्वे असलेल्या खाद्यान्नामुळे जनावरांची प्रकृती सुधारते व स्वास्थ राखले जाते.
=== '''उद्दिष्ट :''' ===
जनावरांच्या खाद्या संदर्भातील संकल्पना माहिती करून घेणे.
जनावरांसाठी चारा बनवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे.
आपण देत असलेल्या चाऱ्याचा जनावरांवर काय व किती परिणाम होतो याचा अभ्यास करणे.

=== '''माहिती :''' ===
जनावरांना चार्याची गरज दोन कारणासाठी असते –
(१) शारीरिक वाढीसाठी
(2) उत्पादनासाठी किंवा कार्यशाक्तीसाठी.
जनावरांना आपण जो चारा देतो त्या सर्वाचेच पचन होते असे नाही त्यामध्ये असणाऱ्या घटकांनुसार व प्रकारानुसार पचनयोग्य घटक वेगवेगळे असतात.
खाद्य व्यवस्थापन :
जनावरांना शरीरपोषणासाठी व दुग्धोउपादनासाठी खाद्याची गरज असते. ज्या आहारातून शरीरपोषणासाठी व दुग्धोउपादनासाठी आवश्यक अन्नद्रव्ये पाचक स्वरुपात मिळतात व भूक भागते त्या आहारास‘समतोल आहार’ असे म्हणतात.
सर्वसाधारणपणे १० लिटर दुध देणार्या गाई/ म्हशीस(वजन अंदाजे ४०० किलो) ६-८ किलो वाळलेला चारा,२५ किलो हिरवा चारा व ५-६ किलो खुराक खाद्य आवश्यक असते.
वाळलेला चारा व हिरव्या चार्याची कुट्टी केल्यास २५ % खाद्याची बचत होते.
सर्वसाधारण जनावरांना त्यांच्या वजनाच्या २ ते २.५ % वाळलेला चारा लागतो.वाळलेला चारा
नसेल तर वजनाच्या ४ ते ६ % हिरवा चारा लागतो. म्हणजे साधरण पूर्ण वाढलेल्या जनावराला ८ ते १० किलो वाळलेला चारा व २० ते ३० किलो हिरवा चारा लागतो.
जनावराना आवश्यक असणारे खाद्य व पाणी
प्राण्याचा वर्ग सरासरी वजन(किलो) दिवसाला सरासरी खाद्य(किलो) दिवसाला सरासरी पाणी (लिटर )
गाय आणि म्हैस १५० ३ ३ ते ४
१७५ ५ ५ ते २०
२०० ५ ते ६ २० ते २२
२५० ५ ते ७ १८ ते २७
३५० ९ ४५ ते ६५
५०० १० ९० ते १००
वरील तक्त्यावरुन जनावरांना किती खाद्य, पाणी द्यावे याचा अंदाज येतो. त्यामाणे सारासार विचार करुन आहार ठरवावा.

=== '''हिरवा चारा बनविन्याच्या पद्धती :''' ===
मुरघास तयार करणे.
अझोला खाद्य तयार करणे.
हायड्रोपोनिक्स
हिरवा चारा हा जनावरांसाठी खुपच उपयुक्त असे खाद्य आहे.आधुनिक तंत्रज्ञान व रासायिनक द्रव्याचा वापर करुन पाण्यात तयार केलेले खाद्य जनावरांसाठी जास्त फायदेशीर व किफायतशीर ठरते.या खाद्याद्वारे जनावरांना आवश्यक प्रथिने,जीवनसत्वे मिळतात व त्याचा परिणाम दुध उत्पादन वढीवर होतो.वाळलेल्या सुक्या चार्याचा उपयोग पोषण आहारासाठी होतो. ओला चारा पोषण आहार व उत्पादन आहार दोन्हीसाठी फायद्याचा ठरतो.
खुराकामध्ये ऊर्जा भरपुर प्रमाणात असते, म्हणून उत्पादन आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास ,हिरवी मका,गवत, उसाचे वाढे या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो ही खाद्ये जनावरांना खाण्यासाठी चिवस्ट लागतात.तसेच खुराकात म्हणजेच साखर काढल्यानंतरची मळी, तेल काढल्यानंतरची पेंड,भरडा यांमध्ये अन्नघटक (प्रथिने) व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात, यामुळे दुधाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होतो व दुधाच्या उत्पादनत वाढ होते. तसेच विशिष्ट प्रथिने,जीवनसत्वे असलेल्या खाद्यान्नामुळे जनावरांची प्रकृती सुधारते व स्वास्थ राखले जाते.

=== '''सुक्या चा-यावरती प्रक्रीया करुन बनविन्याच्या पद्धती : ''' ===

==== '''सुक्या चा-यावरती प्रक्रीया करण्याची गरज –''' ====
1. सुक्या चार्याला चव नसल्यामुळे जनावरे बराचसा भाग खात नाहीत व तो वाया जातो.
2. काही चा-यास बारिक धारदार काटे असतात ते जनावरांना खाताना तोंडाला कापतात व तोंडातील सुक्ष्म भागांना जखमा होतात.
3. पावसाळा संपल्यानंतर जनावराना हिरव्या चार्याची कमतरता भासते,अश्यावेळी सुक्या चा-यावरती अवलंबुन रहावे लागते.परंतु या चा-यामध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषकतत्वे,प्रथिने,जीवनसत्वे पाहीजे त्याप्रमाणात मिळत नाहीत.
==== '''प्रात्यक्षिक''' (साहीत्य प्रती १०० किलो चा-यासाठी) – ====
1. युरिया – १.५ किलो ( १.५%)
2. मिनरल मिक्सर – १ किलो.
3. मोठे मिठ – १ किलो ( १ %)
4. गुळ ( जर उपलब्ध नसेल तर पीठाच्या गिरणीमधील वाया जाणारे पीठ वापरू शकता) – ३ किलो ( ३%)
5. पाणी – ३०-४० लिटर
6. प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री
1. प्रक्रीयेसाठी निवडलेले ठिकाण स्वच्छ करून घ्यावे.
2. वरती सांगितल्याप्रमाणे ३० -४० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये १.५ किलो युरिया चांगल्याप्रकारे मिसळावा.
3. त्यानंतर त्या पाण्यामध्ये मिठ, मिनरल मिक्सर, गुळ( किंवा पिठ) व्यवस्थितपणे मिसळावे.
4. जमिनीवरती प्लास्टीकचा कागद अथवा ताडपत्री अंथरावी. हे उपलब्ध नसल्यास शक्यतो फरशी असलेली किंवा सिमेंटचा कोबा केलेली जमीन निवडावी व ती स्वच्छ करून घ्यावी.
5. त्यानंतर ज्या सुक्या चा-यावरती प्रक्रीया करायची आहे ते साधारणपणे ६ इंच जाडीचे पसरावे व त्यावरती तयार केलेले द्रावण सर्वत्र एकसारखे शिंपडावे. पुन्हा त्यावरती तशाचप्रकारे सुक्या चा-याचा थर द्यावा व तयार केलेले द्रावण त्यावरती एकसारखे शिंपडावे. त्यानंतर सर्व गवत चांगल्याप्रकारे मिक्स करावे पुन्हा ६ इंचाचा थर तयार करून शिल्लक राहीलेले द्रावण त्यावरती छिडकावे व त्याचा ठिग घालुन ठेवावा.
6. ठिग घालताना तो चांगला घट्ट असावा त्यामध्ये कोणत्याप्रकारे हवा रहाणार नाही याची काळजी घ्यावी. व त्यावरती प्लास्टीक पेपर टाकून दोन तासासाठी झाकुन ठेवावे.
7. दोन तासानंतर प्रक्रीया केलेला चारा खुला करून ठेवावा व नंतर जनावरांना खाण्यासाठी द्यावा.

=== '''फायदे :''' ===
पशुखाघ वापरल्याने जनावराच्या स्वास्थ्यामध्ये जलद सुधारणा दिसून येते.
पशुखाद्यामधून योग्य व आवश्यक प्रमाणात जनावरांना शरीरासाठी व दुध उत्पादनासाठी प्रथिने देता येतात.
जनावराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
जनावराची प्रजनन क्षमता मजबूत होवून प्रजनन काळात त्याचे स्वास्थ उत्तम राखले जाते.
जनावरांपासून मिळणा-या उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. उदा : दुधाचे उत्पादन वाढते,वासरे सुधृढ
होतात.

[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]]

संपादने