"कोल्हापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३९:
{{बदल}}
कोल्हापूर जिल्हा व तालुके :
महाराष्ट्राचा अगदी दक्षिणेकडील जिल्हा. कोल्हापूर हे दक्षिणेकडील प्रमुख संस्थान आहे, की जे अक्षांश 15°73’ ते 17°11’ व रेखांश 73°75’ ते 74°70’ दरम्यान पसरलेले आहे. कोल्हापूर ची समुद्र सपाटी पासूनची उंची 546 मीटर असून सह्याद्री पठाराशी सानिध्य असलेला पूर्वेकडे उताराला लागला असलेने जिल्ह्यातील वातावरण असे बनलेले आहे की जे दुष्काळ व टंचाई पासून दूर आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे वातावरण थंडही नाही व उष्णही नाही असे आल्हाददायक आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस सांगली जिल्हा, पश्चिम-उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिम-दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेस कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्हा वसलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7685 चौ.किमी. आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38,75,001 आहे.
महाराष्ट्राचा अगदी दक्षिणेकडील जिल्हा. क्षेत्रफळ ८,१३५ चौ. किमी. लोकसंख्या २०,४८,०४९ (१९७१). १५० ४३’ उ. ते १७० १०’ उ. आणि ७३० ४०’ पू. ते ७४० ४२’ पू. यांदरम्यानच्या या जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी सु. १६० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सरासरी सु. ६० किमी. आहे. याच्या पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस सांगली आणि पूर्व व दक्षिण बाजूंस कर्नाटक राज्यातील बेळगाव हे जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या २•६% क्षेत्रफळ व ४•०६% लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचे बारा तालुके आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ हे तालुके उत्तरेस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल मध्यभागी आणि आजरा, गडहिंग्लज व चंदगड हे तालुके दक्षिणेस आहेत. पूर्वीचे ⇨ कोल्हापूर संस्थान विलीन झाले, तेव्हा त्याचा रायबाग विभाग हल्लीच्या कर्नाटक राज्यात व बेळगाव जिल्ह्याचा चंदगड तालुका या जिल्ह्यात समाविष्ट करून आणि इतर किरकोळ प्रादेशिक बदल करून कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यात आला.
 
भूवर्णन : गगनबावडा तालुक्यातील तळकोकणात मोडणारी ३९ गावे सोडली, तर हा सर्व जिल्हा दख्खन पठाराच्या पश्चिम भागात सु. ३९० ते ५५० मी. उंचीवर आहे. जास्तीत जास्त उंची ९०० मी. पर्यंत आहे. सह्याद्रीची मुख्य रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेलेली असून तिचा एक प्रमुख फाटा उत्तर भागात पूर्वेस गेलेला आहे. इतर फाटे लहान असून नैर्ऋत्य-ईशान्य गेलेले आहेत. जिल्ह्याचा पूर्वभाग त्या मानाने सखल व सपाट आहे. या जिल्ह्यातून कोकणात उतरण्याच्या अनेक वाटा आहेत त्यांपैकी आंबा, फोंडा व आंबोली हे घाट प्रमुख आहेत. जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.