"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
== विरामचिन्हे ==
* पूर्णविराम ( '''.''' ) (Full Stop) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिन्ह संक्षिप्त रूपाशेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि. आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
* स्वल्पविराम ( ''',''' ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
* अपूर्णविराम (''':''') (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुरव्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. '''हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.'''
ओळ १३:
* दुहेरी अवतरण चिन्ह(“…”) : बॊललेले वाक्या मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी विराम चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
* संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पति-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
* 'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते पाच/चार किंवा पाच). २). १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
* तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० रोजी.
* अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी वापरतात. उदा० सुमेध आज एक चित्र काढणार होता. पण –– ?
* शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
* जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठी अप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
* '''थांबा''' : मजकूर वाचताना [[योग्यकर्ता|योग्य]] त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम ('''.'''), स्वल्पविराम (''','''), आणि अर्धविराम (''';''') ही तीन चिन्हे लेखक वापरतात.
* '''आश्चर्य''' : वाक्यातून लेखकाला अपेक्षित आश्चर्यभाव व्यक्त करण्यासाठी उद्गारचिन्ह ('''!''') वापरतात.
* '''प्रश्न''' : वाक्याला प्रश्नार्थक स्वरूप देण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा ('''?''') वापर करतात.
* 'किंवा' या शब्दाऐवजी (/) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.