"चिक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतिहास
No edit summary
ओळ १०:
 
१८८८ साली मुंबई-लोणावळा रेल्वेमार्गाचं काम जोरात सुरू होतं. याच ठिकाणी मगनलाल अगरवाल यांचं छोटंसं मिठाईचं दुकान होतं. त्या दुकानात गुडदाणा विकला जायचा. हा पदार्थ रेल्वेमार्गासाठी काम करणाऱ्या कामगारांचा आवडता होता. एकतर गूळ व दाणे यामुळे खूप सारी ऊर्जा मिळत असे आणि हा पदार्थ चवीलाही छान होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो खिशाला परवडत असे. या पदार्थाची लोकप्रियता लक्षात घेऊन मगनलाल यांनी या गुडदाण्याला मगनलाल चिक्की या नावासह लोकांपुढे आणलं. ही चिक्की जगप्रसिद्ध झाली. आज पुणे-मुंबई वा तत्सम प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाटेवर लोणावळा हा अलिखित थांबा या चिक्कीमुळेही निर्माण झाला आहे. याचा अर्थ चिक्कीचं मूळ फक्त महाराष्ट्रापुरतं नाही. भारतभरात विविध नावांनी चिक्की खाल्ली जाते. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये ती ‘लाइय्या पट्टी’ आहे, तर सिंधी लोकांची ‘लायी’. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर ब्राझीलमध्येही चिक्कीसारखाच पे-दे-मोलेक आणि पेराग्वे मध्ये या पदार्थाला काओ लॅड्रिलो म्हणतात.
 
चिक्कीची खासियत ही की, ती काळासोबत बदलत जाणारी आहे. शेंगदाण्यासोबत तिची सुरुवात असली तरी तीळ, राजगिरा, काजू, बदाम, डाळं, कुरमुरे, सुकामेवा, चॉकलेट या पदार्था पासून चिक्की तयार केली जाते. नव्या पिढीच्या आवडीची चिक्की आहे. उपवासच्या चिक्की ही बाजारात मिळतात. रेल्वेच्या ठेल्यापासून ते मोठ्या मोठ्या दुकानामध्ये चिक्की मिळते.
 
== साहित्य ==
Line ३७ ⟶ ३९:
* काजू चिक्की
* बदाम चिक्की
*राजगिरा चिक्की
*चॉकलेट चिक्की
 
अशा प्रकारे विविध पदार्थ वापरुन चिक्की तयार केली जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चिक्की" पासून हुडकले