"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला.
 
रामजोशी उत्तरायुष्यात कविवर्य [[मोरोपंत|मोरोपंतांच्या]] उपदेशावरून अध्यात्मात रममाण झाले.
 
==हजरजबाबी रामजोशी==
लोकशाहीर राम जोशी शीघ्रकवी आणि हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या शाहिरीची कीर्ती ऐकून दुसऱ्या बाजीराव पेशव्याने दरबारात राम जोशींचा फड ठेवला. पेशव्यांनी त्यांना मानाचा शिरपेच देऊन सत्कार केला. पण जाता जाता एक कोपरखळीही मारली. लहानपणापासून तमाशाचे वेड लागल्याने जोशीबुवा घरातून पळून जाऊन दलित वस्तीत रहायला गेले होते. तिथं हा बामण स्नान-संध्या काय करणार? त्यामुळे पेशवे म्हणाले, "जोशीबुवा संध्येतील चोवीस नावे तरी आता लक्षात आहेत काय?"
 
आता केशवाय नमः, नारायणाय नमः अशी संध्येतली चोवीस नावे सरळ म्हणून दाखवली तर त्यात शाहिराची शान काय? जोशीबुवांनी डफावर थाप मारली आणि सुरू केले:
;केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा?
;जयाचा सकल जनावर ठसा ।।
;माधव महिमा अगाध गोडी, गोविंदाच्या रसा ।
;पीत जा जीव होई थंडसा ।।
आणि अशाप्रकारे संध्येतली चोवीस नावे शाहिरी कवनात म्हणून दाखवली.
 
==सन्मान आणि गौरव==