"प्रवेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] '''त्वरण''' <ref name="भौतिकशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षकtitle = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८८ | पृष्ठ = ४५ | भाषा = मराठी }}</ref> किंवा '''प्रवेग''' <ref name="वैपासंज्ञा">{{स्रोत पुस्तक | शीर्षकtitle = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = परांजपे,गो.रा. | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = ३ | भाषा = मराठी }}</ref> (मराठी नामभेद: '''त्वरा''' ; ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Acceleration'', ''अ‍ॅक्सलरेशन'') म्हणजे [[वेग|वेगातील]] बदलाचा [[काळ|कालसापेक्ष]] दर होय. [[वेग]] ही राशी सदिश असल्यामुळे त्वरणदेखील [[सदिश]] राशी आहे व ओघानेच तिला परिमाण व दिशा असतात. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार याचे मूल्य ''मीटर/सेकंद वर्ग'' (मी./से.<sup>२</sup>) या एककात मोजतात.वस्तूवर कार्य करणारे एकूण बल ही सदीश राशी असून ते वस्तूचे वस्तुमान व वस्तूचे त्वरण यांचा गुणाकार असते. न्यूटनच्या दुसऱ्या गतिनियमानुसार, पदार्थाला प्राप्त झालेले त्वरण म्हणजे वस्तूवर कार्य करणाऱ्या सर्व बाह्यबलांचा परिपाक असतो.
 
उदाहरणार्थ, जेव्हा एका ठिकाणी उभी असलेली (० सदीश वेग) गाडी सुरू होते आणि एका सरळ रेषेत वाढत्या वेगाने प्रवास करते, तेव्हा तिला प्रवासाच्या दिशेने वाढते त्वरण प्राप्त होते. जेव्हा ती गाडी वळण घेते तेव्हा तिला नवीन दिशेत त्वरण मिळते.या उदाहरणात त्या गाडीला प्रवासाच्या दिशेने जे त्वरण मिळते त्याला आपण एकरेषीय त्वरण म्हणू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून गाडीतील प्रवाशांना एखादे बळ त्यांना त्यांच्या आसनाकडे दाबत असल्यासारखे वाटते. जेव्हा प्रवासाची दिशा बदलते तेव्हा त्याला आपण नैकरेषीय त्वरण म्हणू शकतो व त्याचा परिणाम म्हणून गाडीतील प्रवाशांना जणू एखादे बळ त्यांना बाजूला ढकलत आहे असे वाटते. गाडीचा वेग मंदावल्यास, गाडीच्या प्रवासाच्या विरूद्ध दिशेने त्वरण मिळते, ज्याला आपण घटते त्वरणही म्हणू शकतो. त्यामुळे प्रवाशांना एखादे बळ त्यांना आसनापासून दूर (मार्गक्रमणाच्या दिशेने) ढकलत असल्यासारखे वाटते. गणितीय दृष्ट्या घटत्या त्वरणासाठी वेगळे सूत्र नाही: दोन्ही त्वरणे ही वेगबदलाशीच संबंधित आहेत. गाडीतील प्रवाशांचा वेग (वेग आणि दिशा) हा जोपर्यंत गाडीच्या वेगाइतका होत नाही तोपर्यंत, त्यांना वरील त्वरण-धक्क्यांचा अनुभव येतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रवेग" पासून हुडकले