"एमिली शेंकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २:
[[चित्र:Subhas Bose with his wife.png|thumb|right|पती [[सुभाषचंद्र बोस]] यांच्यासमवेत एमिली शेंकल]]
'''एमिली शेंकल''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Emilie Schenkl'' ;) (२६ डिसेंबर, इ.स. १९१० - मार्च, इ.स. १९९६) ही [[सुभाषचंद्र बोस]] यांची [[सचिव]] व [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] सहभागी झालेली व जन्माने [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] स्त्री होती. काही विद्वानांच्या मते, [[सुभाषचंद्र बोस]] यांनी २६ डिसेंबर इ.स. १९३७ रोजी [[ऑस्ट्रिया]]तील बागास्ताइन येथे एमिली शेंकल या युवतीशी गुप्तपणे विवाह केला होता <ref>
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.imdb.com/शीर्षक/tt0349878/trivia | शीर्षकtitle = नेताजी सुभाषचंद्र बोस : द फरगॉटन हिरो (२००५) | भाषा = इंग्रजी
| अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जानेवारी, इ.स. २०१२
}}
ओळ १०:
प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि ब्रिटीश सरकारने हद्दपार केले म्हणून सुभाषचंद्र इ.स. १९३३ साली युरोपात गेले. तिथे व्हिएन्नात जून इ.स. १९३४ मध्ये एमिलीची व त्यांची पहिली भेट झाली. सरकारी अवकृपा आणि हवापालट म्हणून सुभाषचंद्र व्हिएन्नात आले असले तरी ते केवळ पर्यटक नव्हते. भारताची यथास्थिती युरोपातील देशांना कळावी म्हणून सुभाषचंद्रंनी व्हिएन्नात एक ऑफिस उघडले. त्याठीकाणी त्यांची सेक्रेटरी म्हणून एमिली शेंकल कामाला आली. तिची [[मातृभाषा]] जर्मन असली तरी तिला इंग्रजी बऱ्यापैकी येत होते. एमिलीचे कुटुंब सामान्य मध्यमवर्गीय होते. वडिलांना घरखर्चास हातभार लावता यावा म्हणून तिने सुभाषचंद्रांच्या सेक्रेटरीची ही नोकरी स्वीकारली.
 
सुभाषचंद्रांनी एमिलीबरोबर डिसेंबर इ.स. १९३७ मध्ये लग्न केले होते ते गुप्तपणे. युध्दकाळात एका जर्मन स्त्रीने भारतीयाबरोबर लग्न लावणे शक्यच नव्हते. एमिलीने हा संबंध तोडावा असा सल्ला तिला वकीलांनी दिला होता असे तिने नंतर एका दूरचित्रवाणीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. परंतु तिने हा सल्ला झुगारुन लावला व व [[हिंदू]] पध्दतीने फेब्रुवारी इ.स. १९४२ मध्ये लग्न केले.<ref>{{स्रोत पुस्तक| शीर्षकtitle = द साइन ऑफ द टायगर | लेखक = रूडॉल्फ हार्टोग | पृष्ठ = १०८ | भाषा = इंग्लिश }}</ref> त्यानंतर त्यांना अनिता (जन्म: २१ नोव्हेंबर, इ.स. १९४२; व्हिएन्ना) नावाची एक मुलगी झाली.
 
८ फेब्रुवारी इ.स. १९४३ रोजी पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. १८ ऑगस्ट इ.स. १९४५ रोजी विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाला. त्यानंतर इ.स. १९९५ सालापर्यंत म्हणजे ५० वर्षे एमिली जिवंत होती.