"हिमसागर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:Himsagar Express (Jammu Tawi - Kanyakumari) Route map.jpg|250 px|इवलेसे|हिमसागर एक्सप्रेसचा मार्ग]]
'''हिमसागर एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही रेल्वेगाडी भारताच्या [[तामिळनाडू]] राज्याच्या दक्षिण टोकावरील [[कन्याकुमारी]] पासून उत्तरेकडील [[जम्मू आणि काश्मीर]] राज्याच्या [[वैष्णोदेवी]] जवळील [[कटरा]] शहरापर्यंत धावते. सध्याच्या घडीला हिमसागर एक्सप्रेस प्रवासवेळ व अंतर ह्या दोन्ही बाबतीत भारतामधील दुसर्‍या क्रमांकाची गाडी आहे ([[कन्याकुमारी-दिब्रुगढ विवेक एक्सप्रेस]] खालोखाल). हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते कटरा दरम्यानचे ३७८७ किमी अंतर ७३ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या प्रवासादरम्यान हिमसागर एक्सप्रेस भारताच्या १२ राज्यांमधून धावते व एकूण ६९ थांबे घेते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://m.indiarailinfo.com/train/630/10091/1010?kkk=1442046032030|शीर्षकtitle=हिमसागर एक्सप्रेस १६,३१८|प्रकाशक=रेलइनक्वायरी.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
==वेळापत्रक==
ओळ ३२:
[[कन्याकुमारी रेल्वे स्थानक|कन्याकुमारी]] → [[नागरकोविल]] → [[तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक|तिरुवनंतपुरम]] → [[कोल्लम]] → [[एर्नाकुलम]] → [[पालक्काड]] → [[कोइंबतूर रेल्वे स्थानक|कोइंबतूर]] → [[इरोड]] → [[सेलम]] → [[जोलारपेट]] → [[चित्तूर]] → [[तिरुपती]] → [[नेल्लोर]] → [[तेनाली]] → [[विजयवाडा रेल्वे स्थानक|विजयवाडा]] → [[वारंगळ]] → [[चंद्रपूर]] → [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]] → [[इटारसी]] → [[भोपाळ रेल्वे स्थानक|भोपाळ]] → [[झाशी रेल्वे स्थानक|झाशी]] → [[ग्वाल्हेर]] → [[आग्रा छावणी रेल्वे स्थानक|आग्रा]] → [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]] → [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] → [[रोहतक]] → [[लुधियाना]] → [[जालंधर]] → [[पठाणकोट]] → [[कथुआ]] → [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू तावी]] → [[कटरा]]
 
ही गाडी रायपूरच्या जवळ आली की अति वेगाने म्हणजे ताशी १०८ कि.मी. वेगाने धावते तर हजरत निजामुद्दीन ते नवी दिल्ली दरम्यान कमीत कमी वेगाने म्हणजे ताशी २४कि.मी. वेगाने धावते. भोपाळ हबीबगंज ते भोपाल जंक्शन दरम्यान ती ताशी १९ कि.मी. वेगाने धावते. दिल्ली परिसर ओलांडण्यासाठी या ट्रेनला साधारण तीन तास लागतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://runningstatus.in/status/kanyakumari-shri-mata-vaishno-devi-katra-himsagar-express-16317|शीर्षकtitle=हिमसागर एक्सप्रेस रेल्वे चालू स्थिती|प्रकाशक=रनिंगस्टेटस.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}