"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ २८:
'''श्रेया घोषाल''' (जन्म: मार्च १२, १९८४) ही [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
 
श्रेयाने [[सा रे ग म]] प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{स्रोत बातमी|शीर्षकtitle=
Singing in Devdas was God's greatest gift: Shreya Ghoshal|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms|author=Priyanka Dasgupta|publisher=[[The Times of India]]|accessdate=2002-07-21|date=21 July 2002}}</ref> तेंव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], ५ [[फिल्मफेअर पुरस्कार]] व ७ [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
ओळ ३४:
श्रेया मार्च १२, १९८४ रोजी [[दुर्गापूर (लोकसभा मतदारसंघ)|दुर्गापूर]] येथील [[बंगाली लोक|बंगाली]] कुटुंबात जन्मली. ती [[रावतभाटा]] या [[राजस्थान|राजस्थानातील]] छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे [[भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळ|भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात]] प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.<ref name="Biography">[http://www.saregama.com/portal/pages/artist?mode=get_details_by_name&artistName=SHREYA%20GHOSHAL# "श्रेया घोषालची माहिती"]. [[सा रे ग म]]. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.</ref>
 
चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण [[कोटा|कोट्यातील]] महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.<ref name="hindisong">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198 |शीर्षकtitle=Singer Interview: Shreya Ghoshal |publisher=hindisong.com}}</ref>
 
तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही [[झी टीव्ही]]वरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या [[कल्याणजी वीरजी शाह|कल्याणजी]] यांनी तिच्या पालकांना [[मुंबई]]त येण्याबद्दल सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.rediff.com/entertai/2002/jul/10shreya.htm |शीर्षकtitle='I simply closed my eyes and sang' |publisher=rediff.com}}</ref> मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.<ref name="hindisong"/>
 
ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, अणुशक्तिनगर (मुंबई) या शाळांत शिकली. शाळेनंतर [[एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात]] प्रवेश घेतला.<ref name="Biography"/>