"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ३१:
}}
 
डॉ. '''राजन गणपती गवस''' यांचा जन्म [[कोल्हापूर जिल्हा | कोल्हापूर जिल्ह्यातल्या]] [[गडहिंग्लज | गडहिंग्लज तालुक्यातील]] अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] सालचा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/articleshow/2586153.cms|शीर्षकtitle=राजन गवस|दिनांक=2007-11-30|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-01-06}}</ref>
 
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता' च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए., एम.एड., पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे काम करत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tarunbharat.com/news/699653|शीर्षकtitle=राजन गवस : लेखनापलीकडला माणूस|last=Patil|पहिले नाव=Parashuram|दिनांक=2019-06-28|संकेतस्थळ=तरुण भारत|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-01-06}}</ref>
 
== जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले