"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५:
|अ‍ॅक्सेसदिनांक = २००७-०६-१८|वर्ष= १|प्रकाशक = |भाषा=इंग्लिश}}</ref>. इसवीसनपूर्व ३५००चा सुमार [[सिंधू संस्कृतीचा]] काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या [[वायव्य]] प्रांतात म्हणजेच आजच्या [[पाकिस्तान]]ात झाली. [[मोहेंजोदडो]] व [[हडप्पा]] ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध [[दयारामजी सहानी]] यांनी लावला. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ समजला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की [[युरोप]] व [[मध्य आशिया]]तून आलेल्या [[आर्य]] लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून [[सिंधू संस्कृती]] नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला<ref>डिस्कव्हरी ऑफ इंडिया-ले. [[पंडित जवाहरलाल नेहरू]]</ref>. परंतु नव्या संशोधकांचे असे मत आहे असे आक्रमण झालेच नाही. तसेच वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व [[हडप्पा]] व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या [[सिंधू नदी|सिंधू]] व [[सरस्वती नदी|सरस्वती नद्यांच्या]] काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील [[सरस्वती नदी]] ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही [[पंजाब]], [[राजस्थान]] व [[कच्छ जिल्हा|कच्छ]] [[गुजरात]]मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref> साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवीसनपूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्व मध्ये आले ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होते भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार बंगाल ओडीसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदा ने व्यापलेला होता संस्कृत पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात ग्रीक इतिहासकार यांच्या लिखाणातून नही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही ही अस्तित्वा मध्ये होती तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होते जन पदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गण परिषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होते जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जन पदांचा व गणराजयांचा उल्लेख आलेला आहे कोसळ महाजन पदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये चेतवणी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता कोसल चे राज्य मगदा मध्ये विलीन झाले कोसल प्रमाणेच वश्य अवंती आणि मगद हीदेखील मोठी माणस महाजनपदे अस्तित्व मध्ये होती वश्य महाजन पदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच गावाच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कोषांबी नगर होईल हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते कोषांबी तील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले
 
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात [[अलेक्झांडर]]च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य]]ाने [[मगध]]च्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. तिचा [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला [[बौद्ध]] धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/ancient_history4.php|शीर्षकtitle=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= ''[[National Informatics Centre]] (NIC)''}}</ref><ref>Heitzman, James. (2007). "[http://encarta.msn.com/encyclopedia_761571624/Gupta_Dynasty.html#s3 Gupta Dynasty,]" Microsoft® Encarta® Online Encyclopedia 2007</ref> भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]]. महाराष्ट्रातील [[सातवाहन]], या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. अजिंठा, वेरूळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय अशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीमने [[सिंध]] प्रांतात आक्रमण केले व तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.१३व्या शतकात अलाउद्दीन खिलजी नामक शासक आला त्याचे अफगाणपासून ते बंगालपर्यंत शासन केले. यात राजा रतनसिंघ व राणी पद्मावती चा इतिहास न विसरण्या सारखा आहे. दिल्ली सल्तनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघलांचे राज्य सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी शहाजी भोसले|शिवाजी महाराजांनी]] [[मराठा साम्राज्य]]ाची स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. [[मराठा साम्राज्य]]ाच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले.मराठे शाहीनंतर पेशवे आले त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. पहिला बाजीराव पेशवा एक कर्तबगार राजकारणी होता. त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते. पानिपतच्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. [[इंग्रज]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख व जाट असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षकtitle=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला.
 
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|इवलेसे|उजवे|[[इ.स. १९३७]] साली [[महात्मा गांधी]] सोबत [[पंडित जवाहरलाल नेहरू]]]]
 
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर [[मोहनदास करमचंद गांधी|गांधींनी]] चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 322 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे [[भारताचे संविधान]] लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षकtitle=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे ग्रामीण भागांत सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे [[भारतातील आतंकवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगील युदध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत [[अलिप्त राष्ट्रगट चळवळ]]ीचा तसेच [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघाचा]] संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरून सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली.<ref name="ERS">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ers.usda.gov/Briefing/India/ |शीर्षकtitle=India is the second fastest growing economy|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-08-05 |फॉरमॅट= |कृती=Economic Research Service (ERS)|प्रकाशक=[[United States Department of Agriculture|United States Department of Agriculture (USDA)]]}}</ref> गोल गम इस्लामिक आर्किटेक्चर.
 
== प्राचीन सिंधू संस्कृती ==
ओळ १२०:
१२ व्या शतकात [[पृथ्वीराज चौहान]]चा [[मोहम्मद घौरी]]ने पराभव केला व भारतात अधीकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली.<ref>[http://www.sfusd.k12.ca.us/schwww/sch618/Ibn_Battuta/Battuta's_Trip_Seven.html Battuta's Travels: Delhi, capital of Muslim India]</ref> भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारतातील अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. [[शेरशहा सूरी]] ने बांधलेला [[राष्ट्रीय महामार्ग १|कलकत्ता काबूल]] रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले.
 
१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील [[तैमूरलंग]] या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.<ref>[http://www.gardenvisit.com/travel/clavijo/timurconquestofindia.htm Timur - conquest of India]</ref> त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षकtitle=The History of India As told By Its Own Historians Vol III|लेखक=Elliot & Dawson |पृष्ठ=445-446 }}</ref> तैमूरलंग च्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये [[बाबर]] या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला.
 
===मुघल साम्राज्य=== <!-- This section is linked from [[February 24]] -->