"नृसिंह सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
 
'''नृसिंह सरस्वती''' किंवा नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८-१४५९) हे [[श्रीपाद वल्लभ]] यांच्यानंतरचे [[दत्त|दत्तात्रेयांचे]] दुसरे पूर्णावतार मानले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms? | शीर्षकtitle=दत्तसंप्रदायातील सत्पुरुष! | दिनांक=२३ ड‍िसेंबर २००७ | लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> [[नरसोबाची वाडी]], औदुंबर व [[गाणगापूर]] येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.
 
अकोला जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. [[गुरुचरित्र]] या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा ''''वेद'''' मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढीलप्रमाणे-- नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ॐकाराचा उच्चार केला. परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे.