"नरतुरंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
 
ओळ १५:
नरतुरंगमध्ये अनेक चल तारे आहेत. [[आर सेन्टॉरी]] या चल ताऱ्याची दृश्यप्रत कमीत कमी ११.८ आणि जास्तीत जास्त ५.३ आहे. हा तारा पृथ्वीपासून २१०० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याचा आवर्तिकाळ १८ महिने आहे.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}} [[व्ही८१० सेन्टॉरी]] हा आणखी एक चल तारा आहे.
 
बीपीएम ३७०९३ एक [[श्वेत बटू]] तारा आहे ज्याच्यातील [[कार्बन|कार्बनच्या]] अणूंची स्फटिक संरचना झाल्याचा अंदाज आहे. [[हिरा|हिरे]] सुद्धा कार्बनचे वेगळ्या संरचनेचे स्फटिकी स्वरूप असल्याने [[बीटल्स]] या बॅंडच्या "ल्युसी इन द स्काय विथ डायमंड्स" या गाण्यावरून शास्त्रज्ञांनी या ताऱ्याचे टोपणनाव "ल्युसी" असे ठेवले आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.azom.com/news.asp?newsID=993|शीर्षकtitle=Discovery of largest known diamond|दिनांक=February 15, 2004|प्रकाशक=AZoM|accessdate=2008-12-04|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
[[ओमेगा सेन्टॉरी]] (एनजीसी ५१३९), याला तारकासमूहातील "ओमेगा" तारा असे म्हटले जात असले तरी तो नुसत्या डोळ्यांनी दिसणारा [[गोलाकार तारकागुच्छ]] आहे. १५० प्रकाशवर्षे व्यासाचा हा तारकागुच्छ पृथ्वीपासून १७,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा आकाशगंगेतील सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी तारकागुच्छ आहे, जो दुसऱ्या सर्वात मोठ्या तारकागुच्छापेक्षा दहा पट मोठा आहे.<ref name="objects">{{स्रोत पुस्तक|शीर्षकtitle=300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe|लेखक=Wilkins Jamie, Dunn Robert|प्रकाशक=Firefly Books|date=2006|आवृत्ती=1st|location=Buffalo, New York|आयएसबीएन=978-1-55407-175-3|भाषा = इंग्रजी}}</ref> या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारकागुच्छाची दृश्यप्रत ३.७ असून तेजस्विता सूर्याच्या दहा लाख पटीपेक्षा जास्त आहे.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}} याच्यामध्ये अंदाजे एक कोटी तारे आहेत, ज्यापैकी बहुतेक तारे पिवळे बटू तारे आहेत आणि काही लाल राक्षसी आणि निळे-पांढरे तारेसुद्धा आहेत. या ताऱ्यांचे सरासरी वय १२ अब्ज वर्षे आहे. त्यामुळे ओमेगा सेन्टॉरी हे अनेक वर्षांपूर्वी आकाशगंगेने गिळंकृत केलेल्या एखाद्या बटू दीर्घिकेचे केंद्रक होते अशी एक शंका वर्तवली जाते. नुसत्या डोळ्यांनी पाहिले असता ओमेगा सेन्टॉरी अस्पष्ट, अर्धा अंश व्यासाचा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राएवढा दिसतो.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}}
 
नरतुरंगमध्ये [[खुले तारकागुच्छ]] आहेत. [[एनजीसी ३७६६]] हा पृथ्वीपासून ६३०० प्रकाश-वर्षे अंतरावरील नुसत्या डोळ्यांनी दिसणारा खुला तारकागुच्छ आहे. त्यामध्ये अंदाजे १०० तारे असून सर्वात तेजस्वी ताऱ्यांची दृश्यप्रत ७ आहे. [[एनजीसी ५४६०]] हा आणखी एक नुसत्या डोळ्यांनी दिसणारा पृथ्वीपासून २५०० प्रकाश-वर्षे अंतरावरील खुला तारकागुच्छ आहे. त्याची दृश्यप्रत ६ असून त्यात अंदाजे ४० तारे आहेत.{{Sfn|Ridpath|Tirion|2001|pp=108-111}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नरतुरंग" पासून हुडकले