"सुषमा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{विस्तार}}
'''सुषमा देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या [[भारत|भारतीय]] अभिनेत्री व [[एकपात्री नाटक|एकपात्री नाटके]] लिहिणार्‍या आणि सादर करणार्‍या कलावंत आहेत. त्यांनी लिहिलेले तमासगिरिणीच्या जीवनावर लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे [[एकपात्री नाटक]] राजश्री सावंत-वाड सादर करतात. '''सुषमा देशपांडे''' यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा [[दया पवार]] स्मृति [[पुरस्कार]] देण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.realtimes.in/single.php?id=8155|शीर्षकtitle=सुषमा देशपांडे पहुंची रंग शिविर में, बच्चों का बढ़ाया उत्साह - Realtimes News Raipur Chhattisgarh|संकेतस्थळ=www.realtimes.in|ॲक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref>
 
==कारकीर्द==
'''सुषमा देशपांडे''' यांनी अनेक [[मराठी]] चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका सामाजिक आशय असलेल्या कथेवर आधारलेल्या चित्रपट-नाटकांतच आहेत. [[दया पवार]] यांच्या ’बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित व भास्कर चंदावरकर दिग्दर्शित ’अत्याचार’ या चित्रपटात '''सुषमा देशपांडे''' याची प्रमुख भूमिका होती. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित 'संगीत बया दार उघड' हे नाटक रंगभूमीवर आणले. सुधीर जोशी यांच्या चित्रांवर बेतलेली ’चित्रगोष्टी’ नावाची नाट्यकृतीही त्यांनी रंगमंचावर सादर केली. त्यांचा चित्रपट-नाटकांतील सहभाग प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातो. [[सावित्रीबाई फुले]] यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या '''सुषमा देशपांडे''' यांची भूमिका असलेल्या [[एकपात्री नाटक]]ाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Home|शीर्षकtitle=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref> मराठी-हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणा-या, रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा [[लंडन]] येथे नुकत्याच झालेल्या [[चित्रपट]] महोत्सवात ‘आज्जी’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सुषमा देशपांडे यांना गौरविण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://punemirror.indiatimes.com/pune-talking-/past-heroes/Pune-Heroes-Sushama-Deshpande/articleshow/35168949.cms|शीर्षकtitle=Pune Heroes: Sushama Deshpande|last=Jul 30|पहिले नाव=Pune Mirror {{!}} Updated:|last2=2016|संकेतस्थळ=Pune Mirror|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-03-17|last3=Ist|first3=18:51}}</ref>
 
==थिएटर विथ कमिटमेन्ट==
'थिएटर विथ कमिटमेंट'चे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सुषमा देशपांडे यांच्याकडे पाहिले जाते. मंदिराच्या सभामंडपासून ते गावोगावच्या छोट्या रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केले. कधी माइक शिवाय, कधी मेकअप शिवाय त्या रंगभूमीवर उभ्या राहिल्या; पण सामाजिक विषयांवरच्या कलाकृतींच्या सादरीकरणापासून त्या मागे फिरल्या नाहीत. त्यातही विशेषतः महिलांच्या समस्या, त्यांची सुरक्षा, त्यांचे हित अशा बाबी त्यांनी ठळकपणे रंगभूमीद्वारे अधिकाधिक महिलावर्गापर्यंत पोहोचविल्या. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा सामना कसा केला, त्यांनी स्वतःला सक्षम कसे केले आणि त्यांच्या तुलनेत वर्तमानातील महिलावर्गाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी त्या सक्षम आहेत का, यावर भाष्य करून त्याद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश, महाराष्ट्रातील स्त्री-संतांच्या योगदानावर आधारित 'संगीत बया दार उघड' हे नाटकही त्यांनी रंगमंचावर आणले. सुषमा देशपांडे यांची [[एकपात्री नाटक|एकपात्री नाटके]] अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, फिलिपीन्स, चीन यांसारख्या देशांत झाली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/mumbai/actress-sushma-deshpande-conferred-award/|शीर्षकtitle=लंडनमध्ये ‘आज्जी’चा गौरव! अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना पुरस्कार|last=author/online-lokmat|दिनांक=2018-03-27|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref>
 
<br />