"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ७:
==इतिहास==
 
टाटांनी हे ताज हॉटेल उभारण्यामागे जी घटना कारणीभूत झाली ती अशी की, १८६५ मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेदजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. काही टीकाकार मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत. मुंबईला साजेसे एखादे हॉटेल उभारा्वे अशी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकाची इच्छा असल्यामुळे त्याच्या आग्रहाखातर टाटांनी हे हॉटेल बांधले असल्याचे त्यांचे मत आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.guardian.co.uk/commentisfree/2008/dec/03/taj-mahal-hotel-mumbai|प्रकाशक=द गार्डीयन (लंडन)|दिनांक=२०१०-०५-२४|लेखक=एलन, चार्ल्स (३ डिसेंबर २००८) . |शीर्षकtitle=“ताज हॉटेल संहारातून पुन्हा उभे राहिले”. |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचे रूपांतर ६०० पलंगाच्या हॉस्पिटलमध्ये झाले होते. आज जी ताज पॅलेसच्या बाजूची टोलेजंग इमारत दिसते आहे ती अपोलो बंदरभागातील हॉटेल 'ग्रीन हॉटेल' म्हणून ओळखली जात होती. स्वस्त किंमतीसाठी आणि रानटी टोळ्यांच्या मेजवानीच्या कार्यक्रमासाठी हे हॉटेल कुप्रसिद्ध होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=|प्रकाशक=|दिनांक=|शीर्षकtitle=ताज खंड ३२, क्र.३, थर्ड क्वार्टर २००३, फातमा आर झकेरिया संपादित. ताज.मॅगझीन@ताजहॉटेल्स.कॉम.|भाषा=इंग्लिश}}</ref> १९७३ मध्ये टाटांनी हे हॉटेल विकत घेऊन त्याच्या जागी आताची ताज हॉटेलची दुसरी टोलेजंग इमारत बांधलेली आहे.
 
 
ओळ २१:
 
==भोजन कक्ष ==
ह्या हॉटेल परिसरात उत्तम भोजनासाठी काही उपहारगृहे <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/hotels/info/the-taj-mahal-palace-and-tower-259671|प्रकाशक=क्लियरट्रिप|दिनांक=|शीर्षकtitle=हॉटेलची वैशिष्ट्ये|भाषा=इंग्लिश}}</ref> आहेत, ती पुढीलप्रमाणे :
* ॲक्वॅरिस
* कॉन्टिनेन्टल आणि इटालियन क्विझिन्स
ओळ ४१:
 
==२६-११-२००८ रोजीचा दहशतवाद्यांचा हल्ला==
ताज हॉटेलवर [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला]] झाला. या हल्ल्यामुळे ताजचे आर्थिक नुकसान झाले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.guardian.co.uk/world/2008/nov/27/mumbai-terror-attacks|प्रकाशक=द गार्डीयन (लंडन)|दिनांक=२००८-११-२८|लेखक=रमेश, रणदीप (२७ नोव्हेंबर २००८) |शीर्षकtitle=“अजूनही डझनभर लोक दहशवादयांकडे ओलीस”|भाषा=इंग्लिश}}</ref> या हल्ल्याच्या वेळेस काही नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते आणि जवळजवळ १६७ नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यात काही परदेशी नागरिकांचासुद्धा समावेश होता. तीन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये भारतीय कमांडोनी शेवटच्या दिवशी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.
 
 
ताजमहाल हॉटेलमधील ज्या विभागाचे कमी नुकसान झाले होते, ते विभाग दि. २१ डिसेंबर २००८ रोजी पुन्हा सुरू करण्यात आलेले होते. परंतु सर्वांत प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक वारसा असलेला विभाग चालू होण्यास बरेच महिने जावे लागले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.voanews.com/english/2008-12-21-voa10.cfm|प्रकाशक=वॉइस ऑफ अमेरीका|दिनांक=२००८-१२-२२|लेखक=पसरीचा, अंजना (२००९-१२-२१). |शीर्षकtitle=“हल्ल्यानंतर हॉटेल जनतेसाठी खुले”.{{मृत दुवा}}|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
जुलै २००९ मध्ये [[भारत]] - अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी जेव्हा हिलरी क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती त्यावेळी या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी या घटनेमध्ये ज्यांना प्राण गमवावे लागले होते त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व नागरिकांसाठी श्रद्धांजली अर्पण केली होती. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/newsMaps/idUSTRE56H0ST20090718|प्रकाशक=रुटर्स|दिनांक=|लेखक=मोहम्मद , अर्शद (१८ जुलै २००९). |शीर्षकtitle=“क्लिंटनची मुंबई भेट”.|भाषा=इंग्लिश}}</ref> १५ ऑगस्ट २०१०च्या स्वातंत्र्य दिनी पुनर्रचित ताज महाल हॉटेल नव्याने लोकांसाठी खुले झाले. ६ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे हल्ल्यानंतर हॉटेलला भेट देणारे पहिले परदेशी नागरिक होते. त्यावेळी ताजच्या गच्चीवरून त्यांनी केलेल्या भाषणात ताज हे भारतीयांच्या ताकदीचे व निर्भयपणे घटनेला सामोरी जाऊन पूर्वस्थितीत येण्याच्या गुणधर्माचे प्रतीक असल्याचे सांगितले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/newsMaps/idUSTRE56H0ST20090718|प्रकाशक=लॉस ॲन्जलिस टाइम्स|दिनांक=२०११-०७-०४|शीर्षकtitle="ओबामांची मुंबईला भेट".|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==साहित्य==