"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २२५:
बॅबिलॉनमध्ये अलेक्झांडर नव्या युद्धाची तयारी करत होता. हे युद्ध अरबांबरोबर लढण्याचे घाटत होते. रोम आणि सिसिलीसह युद्ध करण्याचाही अलेक्झांडरचा मानस होता असे सांगितले जाते. याच दरम्यान आयोजित एका समारंभात अलेक्झांडरने अतिमद्यपान केले. समारंभानंतर आपल्या एका मित्राच्या आमंत्रणावरून अलेक्झांडरने त्याच्या सोबत जाऊन अधिक मद्यपान केल्याचे सांगितले जाते.त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळीच अलेक्झांडर आजारी पडला आणि उत्तरोत्तर त्याची तब्येत बिघडत गेली. या आजारपणात त्याने आपल्या हातातील आंगठी पेर्डिक्कसला काढून दिली आणि ’आपण राज्य सर्वशक्तिमानाच्या हाती सोपवतो आहोत’ अशी घोषणा केली असे इतिहास सांगतो.
 
इसवी सन पूर्व ३२३ मध्ये ११ जूनच्या दुपारी अलेक्झांडर द ग्रेट बाबिलॉनच्या दुसर्‍या नेबुकड्रेझर या राजाच्या राजवाड्यात मरण पावला. त्याचे वय फक्त ३३ होते. त्याच्या म्रूत्यूचेमृत्यूचे खरे कारण अजून समजलेले नाही.
 
 
=== राज्याची विभागणी ===
 
अलेक्झांडरच्या मृत्यूपश्चात त्याच्या राज्याला उत्तराधिकारी निवडला गेला नसल्याने त्याच्या राज्याची विभागणी कशी करायची याबाबत त्याच्या महत्त्वाच्या सेनापतींमध्ये एकवाक्यता झाली नाही. अलेक्झांडरच्या पश्चात त्याचा एक सावत्र भाऊ अरिडिअस, बर्सिन या दासीपासून झालेला पुत्र हेरॅक्लीस आणि रॉक्सेनच्या गर्भातील अंकुर या सर्वांचा राज्यावर दावा लागत होता.
 
== व्यक्तिचित्र ==