"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो संदर्भ त्रुटी काढली
ओळ ३२:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' किंवा '''भव्य स्मारकशिल्प''' (''Monument memorial'') हा नवी [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद|संसद]] [[संसद भवन|भवन परिसरात]] [[इ.स. १९६७]] मध्ये उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे.<ref>https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp</ref><ref name="Ambedkar and Buddhism" />
 
१४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षकtitle=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=}}</ref>
 
== रचना ==
हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. आधारासह किंवा चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची सुमारे २५ फूट आहे. हा पुतळा साधारण मनुष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान|भारतीय संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.<ref name="Ambedkar and Buddhism">{{स्रोत पुस्तक|शीर्षकtitle=Ambedkar and Buddhism - The Significance of Ambedkar|last=Sangharakshita|first=|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishers|year=|isbn=9788120830233|location=|pages=3|दुवा=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA145&dq=ambedkar+and+buddhism+google&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjUqe7C1cveAhWIqY8KHbt2CVcQ6AEIDDAB|शीर्षकtitle=|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
== इतिहास ==
[[चित्र:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|thumb|भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
 
हा पुतळा ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने'' संसद परिसरासाठी भेट दिला होता आणि यासाठी आंबेडकरवादी समाजाने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीद्वारे पैसा गोळा केला होता. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा [[मुंबई]]चे शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला होता. ब्रह्मेश वाघ यांना हा पुतळा बनवण्यासाठी आंबेडकरांच्या पत्नी [[सविता आंबेडकर]] यांनी सर्वतोपरी मदत केली. बाबासाहेबांचे पायापासून ते डोक्यापर्यंतचे सर्व साहित्य त्यांना पुरवले. हा पुतळा दोन वर्षाच्या परिश्रमानंतर तयार झाला आहे. यापूर्वीही ब्रह्मेश वाघ यांनी इ.स. १९५९ साली [[मुंबई]]तील कूपरेज मार्गावर असलेला डॉ. आंबेडकरांचा सर्वप्रथम पुतळा तयार केला होता.<ref name=लोकराज्य>{{जर्नल स्रोत|last1=मानकर|first1=मिलिंद|शीर्षकtitle=बाबासाहेबांचे पुतळे|जर्नल=लोकराज्य|दिनांक=डिसेंबर २०१७|page=१४}}</ref>
 
=== अनावरण ===