"तंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
पूर्ण बहरास आलेली [[हिंदू]] धर्मामधील व [[बौद्ध]] धर्मामधील चळवळ वा सांस्कृतिक शैली म्हणून तंत्रमार्ग इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या मध्यास आढळून येतो आणि इस १००० च्या सुमारास अभिनव गुप्ताच्या काळात तिचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो असे जॉर्ज फ्युअरस्टाईनचे मत आहे. <ref> तंत्रा - द पाथ ऑफ एक्स्टसी, १९९८, प्रकाशक शांभाला</ref>
 
== व्याख्या ==
'तनु विस्तारे' या विस्तारार्थक धातूपासून तंत्र शब्द बनला आहे. ज्याच्या द्वारे अध्यात्मज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञानाचा विस्तार केला जातो, ते तंत्रशास्त्र होय. कामिकागमात तंत्राची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे :

 
'''तनोति विपुलानर्थान् तस्वमन्त्रसमन्वितान् । 
त्राणं च कुरुते यस्मात् तन्त्रमित्यभिधीयते ।।'''
 
अर्थ - तत्त्व आणि मंत्र यांनी युक्त अशा व्यापक अर्थाचा विस्तार करणारे आणि (साधकांचे साधनेच्या द्वारे) परित्राण करणारे जे शास्त्र, त्याला तंत्र असे नाव आहे. <ref> भारतीय संस्कृतिकोश, खंड ३, संपादक महादेवशास्त्री जोशी </ref>
 
==मुख्य विचार==
"https://mr.wikipedia.org/wiki/तंत्र" पासून हुडकले