"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३४२:
 
==परिवहन==
अ) '''मार्ग'''
 
महाराष्ट्र व इतर राज्यांच्या विविध प्रमुख नगरांशी लातुर जोडलेले आहे. मार्ग जोडणी उत्तम आहे व मुम्बई, पुणे, नागपुर, सातारा, कोल्हापुर, सांगली व औरंगाबादशी जोडणारे मार्ग चार मार्गिका महामार्गात परीवर्तित होत आहेत. राष्ट्रिय महामार्ग ३६१ लातुरातुन जातो.
 
१)तुळजापुर-औसा-लातुर-अहमदपुर-नान्देड-यवतमाळ-वर्धा-नागपुर राष्ट्रिय महामार्ग ३६१
 
२) मण्ठा-देवगाव फाटा-शेलु-पाथरी-परळी वैद्यनाथ-अम्बाजोगाई-रेणापुर-लातुर ३६१
 
३)बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड-लातुर-रेणापुर-नळेगाव-दिघोळ-उदगिर-देगलुर-अदमपुर-खतगाव-सग्रोळी-निजामाबाद-मेतपल्ली-मंचेरल-चिन्नुर-सिरोंच-विजापुर-जगदलपुर-कोटपद-बोरगम
 
४)नान्देड-कन्धार-जळकोट-उदगिर-बिदर-लातुर-निटुर-निलंगा-औराद-जहिराबाद
 
आ) '''अन्तर्नगरीय'''
 
मुख्यालयाचे वाहन मार्ग ९६% गावांना जोडतात. प्रथम रेल्वे व नन्तर विविध शासन विभागासह, हैद्राबाद राज्याद्वारे १९३२ ला प्रवासी परिवहन सेवांच्या राष्ट्रियीकरणाची योजना सुरु झाली, जी सार्वजनिक मार्ग परिवहन क्षेत्रातील अग्रणी होती. भारतिय राज्यांच्या पुनर्रचनेनन्तर व १ जुलै १९६१ ला मराठवाडा राज्य परिवहनाचा व मुम्बई राज्य परिवहन महामण्डळाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळात विलय झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळ व इतर काही खासगी संचालक राज्याच्या सर्व भागात व गावांना वाहन सेवा पुरवतात. महाराष्ट्र व इतर राज्यांच्या सर्व प्रमुख नगरांना जोडणारे प्रस्थापित जाळे खासगी वाहनांकडे आहे.
 
इ) '''स्थानिक'''
 
"लातुर महानगरीय परिवहन" ही खासगी वाहन सेवा आहे, जी नगराच्या सर्व भागांना व दुरवरील औद्योगिक उपनगरांना जोडते. लातुर महानगरीय परि‌वहन स्थानिक वाहने दुर्गम भागांसह नगरात धावतात व नगराचे विविध भाग व उपनगरांना जोडतात.
 
ई) '''वायु'''
 
तालुक्याच्या वायव्येस १२ किमी अन्तरावर, चिंचोली राववाडीमध्ये,लातुरात विमानतळ आहे. विमान इन्धन, दिशादर्शनासह रात्रीचे अवतरण, वाहनतळ, विमानतळ अग्निशामक व संरक्षक सेवांचा विमानतळ सुविधेत समावेश होतो. उत्तम सुविधांनी युक्त इमारतीत अति महत्वाचे व्यक्ती कक्ष, प्रस्थान व आगमन कक्ष, निवासी कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र व उपहारगृह आहे. सार्वजनिक कार्य विभागाद्वारे १९९१ ला ‌विमानतळ निर्मित झाले व पुन्हा म.औ.वि.म.ला हस्तान्तरित झाले. ₹ १४ कोटी खर्चुन त्याची सुधारणा केली व रिलायंस विमानतळ विकसकाकडुन ९९ वर्ष कन्त्राटावर चालवले जात आहे. विमानतळाहुन सध्या नियोजित वायु सेवा नाही, पण महिन्यात १४ ते १६ विमान उड्डाणे दिसतात.
 
उ) '''रेल्वे'''
 
भारतिय भुभाग रेल्वेच्या दक्षिण पश्चिम भागावरील लातुरपासुन मिरजपर्यन्त वायव्येस लातुर मिरज रेल्वे ३९१ मैल (६२९ किमी) धावते व १९२९ ते १९३१ ला बान्धलेले आहे. लातुरातील सर्व रेल्वे या रुन्द आहेत. या मध्य रेल्वेत येतात. जेव्हा बार्शी मार्गाचे अरुन्दपासुन रुन्दमध्ये रुपान्तर झाले, तेव्हा लातुर स्थानक पुन्हा बान्धले गेले. सप्टेम्बर २००७ मध्ये लातुर ते उस्मानाबाद व ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद ते कुर्डुवाडीत मार्गाचे रुपान्तर झाले. लातुर आता कुर्डुवाडी मार्गी रेल्वेने थेट जोडलेला आहे. उस्मानाबादात सुरु झालेल्या रेल्वेद्वारे हे हैद्राबादशी जोडलेले आहे. ऑक्टोबर २००८ मधिल कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वेच्या आगमनाने, लातुर, लातुर मार्ग, परभणी व औरंगाबादचे पुर्वीचे वाहन स्थगित झाले. तालुक्यात ७५ किमी लाम्बीचा रेल्वे मार्ग आहे. लातुर कुर्डुवाडी मिरज हा अरुन्द मार्ग होता. २००२ मध्ये कुर्डुवाडी पण्ढरपुर भाग रुन्द झाला. सप्टेम्बर २००७ मध्ये लातुर उस्मानाबाद भागाचे रुन्दिकरण झाले. (उस्मानाबाद अरुन्द मार्गावर नव्हते व नविन रुन्द मार्ग उस्मानाबादहुन जाण्यासाठी मार्ग बदलला. ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद कुर्डुवाडी भाग वापरायोग्य बनला.) पण्ढरपुर मिरज भागसुद्धा पुर्वी अरुन्द होता व प्राथमिकतेने रुन्दिकरण चालु आहे. हा महत्वाचा मार्ग आहे. रेल्वेच्या सहाय्याने ते कोकण बाजारपेठ गाठतील व येथील अर्थव्यवस्था सुधरेल.
 
मध्य रेल्वे विभागाच्या सोलापुर मण्डलाच्या लातुर मिरज मार्गावर लातुर स्थानक (संकेताक्षर: एल यु आर) स्थित आहे. लातुर मार्गावरील विकाराबाद-लातुर मार्ग-परळी मार्गावर सुरु झालेली मनमाड-काचेगुड रुन्द रेल्वे मार्ग ही लातुरच्या वाहतुकीची प्रमुख धमणी आहे. हा औरंगाबाद व हैद्राबाद दरम्यान मध्यस्थीचे कार्य करतो. लातुर हे बंगळुर, मुम्बई, पुणे, नागपुर, मनमाड, औरंगाबाद, नान्देड, परभणी, परळी वैद्यनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, नाशिक व काचेगुड या नगरांशी जोडलेले आहे. शहरात लातुर, हरंगुळ व औसा मार्ग ही ३ स्थानके आहेत.
 
'''चतु:सिमा'''
 
पुर्व- चाकुर
 
पश्चिम-
 
उत्तर- रेणापुर
 
दक्षिण- औसा
 
*
*
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले