"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२१:
 
==प्रशासन व राजकारण==
अ) '''स्थानिक प्रशासन'''
 
लातुरला पुर्वी नगर परिषद होती, जिची स्थापना १९५२ ला झाली. लातुर महानगर पालिका ही स्थानिक नागरी संस्था आहे. ती ५ क्षेत्रात विभागली आहे. ११७.७८ चौरस किमी (४५.४८ चौरस मैल) इतके महानगर पालिका क्षेत्र आहे. २०११ मध्ये राज्य शासनाद्वारे ही महानगर पालिका स्थापली गेली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ३०/१०/२००६ च्या पत्रात अविकसित लातुर क्षेत्राला अधिसुचित करण्याची व सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. १६,६९६ हेक्टर नगर क्षेत्रासहित २६,५४१ हेक्टर अविकसित क्षेत्रास अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सिडकोने पाठवला आहे. अधिसुचित क्षेत्रात ४० गावांचा समावेश आहे. प्रकल्पात स्थापत्य विकास व प्रगती कार्यासाठी १००% भुमी हस्तगत न करण्याचे पण न्युनतम भुमी हस्तगत पद्धत स्विकारण्याचे नियोजन आहे. महानगर ७० निर्वाचन क्षेत्रात विभाजित आहे ज्यांना प्रभाग म्हणतात व प्रत्येक प्रभागातिल जनतेद्वारे निर्वाचित नगरसेवक प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. महानगर पालिका पिण्याचे पाणी, स्वच्छता, मार्ग, पथदिवे, आरोग्य, प्राथमिक शिक्षण इत्यादी मुलभुत सुविधांसाठी उत्तरदायी आहे. नागरिकांवर लावलेल्या नगर करातुन महानगर पालिका महसुल मिळवते. प्रशासनाचे विविध विभागांतिल इतर अधिकार्यांद्वारे सहाय्यित भारतिय प्रशासन सेवेतिल मुख्य कार्यकारी अधिकारी नेतृत्व करतो.
 
आ) '''राज्य व केन्द्र प्रशासन'''
 
लातुर लोकसभा क्षेत्रात व शहर आणि ग्रामिण या २ विधानसभा क्षेत्राअन्तर्गत येतो.
 
इ) '''प्रसिद्ध राजकारणी'''
 
केशवराव सोनवणे लातुर क्षेत्रातील पहिले मन्त्री होते, जे मुख्यमन्त्री यशवन्तराव चव्हाण मन्त्रीमण्डळात व नन्तर वसन्तराव नाईक मन्त्रीमण्डळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मन्त्री होते. लातुर दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव, लातुरला झाला होता. त्यांनी २ वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री व केन्द्रिय मन्त्री म्हणुन सेवा केली. भारतिय जनता पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहाशी सम्बन्धित घटनेची तपासणी करत असलेले केन्द्रिय तपास आयोगाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेम्बर २०१४ रोजी झालेली हत्या राष्ट्रिय राजकारणात वादाचा विषय आहे व ज्याचे प्रेतदहन गातेगावला झाले. विक्रान्त विक्रम गोजमगुण्डे २०१९ ला महापौर झाले.
 
== पर्यटन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले