"जागतिक साथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
साथरोगाच्या उद्रेकाच्या व्यवस्थापनामध्ये मुख्यतः दोन डावपेच असतात - '''नियंत्रण''' आणि '''सौम्यकरण'''. उद्रेकाच्या प्रारंभिक अवस्थांमध्ये नियंत्रणाचा विचार केला जाऊ शकतो. नियंत्रणामध्ये निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना इतर लोकसमूहापासून अलग ठेवणे; संसर्गनियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि उपलब्ध असल्यास लसीकरण यासारख्या उपचारात्मक उपायांचा समावेश होतो. नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या साथरोगासाठी सौम्यकरणाचा विचार करावा लागतो. यामध्ये रोगाच्या प्रसाराची गती कमी करण्याचा आणि त्यायोगे समाजावर आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या दुष्प्रभावांचे नियंत्रण करण्याचा याचा प्रयत्न केला जातो. वस्तुतः नियंत्रण आणि सौम्यकरणाचे उपाय एकाच वेळी सुरू केले जाऊ शकतात.
 
साथीचा रोग पसरत असताना दिवसागणिक त्याच्यामुळे लागण झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत जाते. एक दिवस असा येतो की लागण झालेल्या दैनिक व्यक्तींची संख्या सर्वाधिक होते आणि त्यानंतर ती कमी कमी होत जाते. दैनिक सर्वाधिक रुग्ण काढण्याच्याअसण्याच्या अवस्थेला '''साथीचे शिखर''' असे म्हणतात. साथरोगाचा मुकाबला करताना हे शिखर जास्तीत जास्त चपटे करण्याचा प्रयत्न केला जातो; अर्थात लागण झालेल्या दैनिक व्यक्तींची संख्या आरोग्य व्यवस्थेला सहजपणे हाताळता येऊ शकेल एवढीच राखण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच '''विलंबाचा डावपेच''' असे म्हटले जाऊ शकते. या वाढीव कालावधीमध्ये लसीकरण व अन्य उपचारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. रोगाचा मुकाबला करताना बिगर-औषधीय उपायही केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ फ्ल्यूच्या साथीमध्ये हात स्वच्छ ठेवण्यासारखे वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय; तोंडावर मास्क बांधणे; स्वतःला इतर लोकांपासून अलग करणे; शाळा बंद ठेवणे आणि लोकांची गर्दी होईल अशा गोष्टी टाळणे; लोकजागृती करणे आणि साफसफाईसारखे उपाय.
 
साथरोगाचा मुकाबला करताना '''दमन''' किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्न हा एक डावपेच वापरला जातो. एका रुग्णाकडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ नये असा पुरेपूर कठोर प्रयत्न यामध्ये केला जातो. हे करताना संपूर्ण लोकसंख्येमध्ये सामाजिक अंतरन; रुग्णाला स्वतःच्या घरीच विलगीकरणात ठेवणे अशा उपायांचा समावेश होतो. २०९१-२०च्या करोना विषाणूच्या जागतिक साथीमध्ये चीनने या डावपेचाचा वापर केला. यासाठी संपूर्ण शहरे टाळेबंदावस्थेत वा लॉकडाऊनमध्ये ठेवलेली होती. हा डावपेच कठोर असून त्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचाही विचार करावा लागतो.