"जागतिक साथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
No edit summary
ओळ ३:
 
[[देवी]] व [[क्षयरोग]] अशा रोगांच्या अनेक जागतिक साथी इतिहासात आढळून येतात. चौदाव्या शतकात काळा मृत्यू (वा [[प्लेग]]) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक साथीने अंदाजे ७५-२०० दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला होता. अन्य मोठ्या जागतिक साथींमध्ये १९१८ मधील [[इंन्फ्ल्युएंझा]] (स्पॅनिश फ्ल्यू) आणि २००९ मधील इंन्फ्ल्युएंझा जागतिक साथ (एच१एन१) यांचा समावेश होतो. सद्यकालीन जागतिक साथरोगांमध्ये एचआयव्ही / [[एड्स]] आणि [[कोव्हिड-१९]] यांचा समावेश आहे.
 
== व्याख्या व टप्पे ==
 
जागतिक साथीदरम्यान साथीचा रोग आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडतो आणि जगभर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे रुग्ण आढळतात. केवळ विस्तृत विभागावर पसरला आहे किंवा त्याच्यामुळे अनेक लोक मृत्यू पावलेले आहेत म्हणून एखादा रोग जागतिक साथरोग ठरत नाही. तो संपर्कजन्यही असावा लागतो. [[कर्करोग]] अनेक मृत्यूंसाठी जबाबदार आहे, परंतु तो साथीचा रोग मानला जात नाही कारण तो संपर्कजन्य वा संसर्गजन्य नाही.
 
जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वी इंफ्ल्युएंझा विषाणूच्या प्रसाराच्या अभ्यास करून साथरोगाच्या सहा टप्प्यांचे वर्गीकरण दिले होते. सुरुवातीस [[विषाणू]] प्राण्यांना संसर्गित करतो; नंतर प्राण्यांमुळे काही व्यक्तींना तो रोग होतो. यानंतरच्या टप्प्यात विषाणू अशाप्रकारे पसरतो की एका व्यक्तीपासून इतर व्यक्तींमध्ये त्याचा थेट संसर्ग होतो. अखेरच्या टप्प्यात हा विषाणू संपूर्ण जगभर पसरलेला असतो. मात्र फेब्रुवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार “साथरोगासाठी अधिकृत असे कोणतेही वर्गीकरण नाही.”
 
[[वर्ग:संसर्गजन्य रोग]]