"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी माहिती लिहिली
ओळ ४:
 
हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मत, दर्शने आणि संप्रदायांचा समावेश आहे. अनुयायांचा संख्येच्या आधारावर हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील हिंदू धर्मियांची संख्या साधारण १अब्ज१२ कोटी एवढी आहे. बहुसंख्यांक हिंदू हे [[भारत]] [[नेपाळ]] आणि [[मॉरिशस]] ह्या देशात राहतात.
 
== '''हिंदू शब्दाची व्युत्पत्ती''' ==
धर्माची सुरुवात सिंधू नदीच्या पलीकडील भारत देशात झाली. आणि बाहेरील देशातील लोक सिंधू नदीच्या पलीकडे लोक म्हणून ओळखत. पर्शियन लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत; कारण पर्शियन भाषेतील 'स' ह्या अक्षराचा अभाव. असे एक मत आहे.
 
तर काही विद्वानांचा मते , हिंदू हा शब्द सिंधू शब्दांपेक्षाही प्राचीन आहे.
 
ऋग्वेदातील बृहस्पती आगम ह्या भागातील श्लोकात खालील प्रमाणे उल्लेख आढळतो-
 
: हिमालयं समारभ्य यावद् इन्दुसरोवरं ।
: तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।
: याचा अर्थ असा की , हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेला हा भूभाग व देवतांनी निर्मिलेला हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो.
: मेरुतंत्र ह्या शैवग्रंथात हिंदू शब्दाची व्याख्या अशी आहे-
: हीनं च दूष्यत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये।
: याचा अर्थ असा की , जो हीनता आणि अज्ञानतेचा त्याग करतो तो हिंदू.
: तर माधवदिग्विजय या ग्रंथात असे आहे-
:
 
अर्थात , जो ओमकार नाद करतो, कर्मावर विश्वास ठेवतो, गोभक्ती करतो आणि हिंसेचे निर्दालन करतो तो हिंदू .
 
== इतिहास ==