"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
 
इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून [[लंडन]] गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या 'किंग्ज मेन' या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
 
==नाटकीय कारकीर्द==
१५८५ पासून शेक्सपिअरची नाटय़कारकीर्दनाट्यकारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाटय़संस्थानाट्यसंस्था निर्माण केली. या संस्थोतर्फेचसंस्थेतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. शेक्सपियरची सुरुवातीची नाटके विनोदी किंवा ऐतिहासिक होती. त्या नाटकांतून तो स्वत:देखील अभिनय करायचा. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पैसाही मिळवून दिला. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय १५४ सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे.
 
त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली.
ओळ ४९:
 
==शेक्सपिअरचे वाङ्‌मय==
विल्यम शेक्सपियरच्या काळात त्याच्या काळात नीट प्रकाशित झाले नव्हते. त्यामुळे त्याच्याबाबत बरेच तर्कवितर्क होत असत. शेक्सपियरबरोबर 'किंग्ज मेन' कंपनीतकाम करणाऱ्या जॅन हेमिंग्ज आणि हेन्‍री काँडेल या त्याच्या दोन मित्रांनी शेक्सपियर वारल्यनंतर तीन वर्षांनी त्याचे लिखाण एकत्र करून प्रकाशित केले. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीकडे त्या दोघांनी प्रकाशित केलेल्या लिखाणाची एक प्रत आहे. रसिकांसाठी ही प्रत मुंबईच्या म्युझियममध्ये काही काळासाठी एका खास दालनात ठेवली होती.
यांत काव्य आणि नाटके येतात. मराठीमध्ये, परशुराम देशपांडे यांनी ’राजहंस एव्हनचा-शेक्सपिअर’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तकांच्या संचात शेक्सपिअरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.
 
यांतशेक्सपियरच्या काव्यलिखाणांत काव्ये आणि नाटके येतात. मराठीमध्ये, परशुराम देशपांडे यांनी ’राजहंस एव्हनचा-शेक्सपिअर’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तकांच्या संचात शेक्सपिअरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.
 
==काव्ये==