"गगनबावडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
पळसंबे मंदिरे
तामिळनाडूमधील महाबलीपुरमची एकाश्म मंदिरे (रथ या नावाने ओळखली जातात) पाहायला जगभरातून लाखो लोक येतात, पण महाराष्ट्रातील एकाश्म मंदिरे स्थानिक लोकांशिवाय फारशी कोणाला परिचित नाहीत. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर कोल्हापूर पासून ४० कि.मी. अंतरावर आसळज गाव आहे. तिथून ४ कि.मी. अंतरावर पळसंबे या गावी एका ओढय़ातच रामिलगेश्वर नावाने ओळखली जाणारी जागा म्हणजेच ही एकाश्म मंदिरे होत. त्या ओढय़ात काही अजस्र शिळा आहेत. त्यांचा खालचा भाग तसाच ठेवून वरच्या अध्र्या भागात कोरीव मंदिर उभारले आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारची ही खोदीव मंदिरे आहेत. इथे बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेने ओढय़ाकडे उतरत जावे. तिथे दाट झाडीत एकाच पाषाणातून कोरून काढलेले मंदिर सामोरे येते. दक्षिण काशी कोल्हापूर आणि पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सीमेवरील ही मंदिरे आजही दुर्लक्षितच आहेत.
 
निसर्गाचा सौंदर्य अविष्कार : गगनबावडा
गगनबावडा तालुका म्हटले की, पावसाचे माहेरघर म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. कोल्हापूरमधून ६0 किलोमीटर हे अंतर असून एस. टी. बसेस भरपूर सुविधा आहे. जाण्यासाठी एक तास लागतो. राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते.
येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. हिरवीगार शाल पांघरूण लांबच लांब पसरलेल्या लहान मोठ्या टेकड्या कोकणातील जीवनाचे दर्शन घडवितात. करूळ व भुईबावडा घाटात पावसाळ्यात उगम पावणारे लहान मोठे धबधबे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हौस भागविण्यास पुरेसे ठरतात. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो. येथील गगनगड न पाहिले तर नवलच.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गगनबावडा" पासून हुडकले