"शिव तांडव स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुढील कडव्यांचे अर्थ लिहिले.
पुढील कडव्यांचे अर्थ लिहिले.
ओळ ७४:
जटा-कटा-हसं-भ्रमभ्रमन्नि-लिम्प-निर्झरी- -विलोलवी-चिवल्लरी-विराजमान-मूर्धनि . धगद्धगद्धग-ज्ज्वल-ल्ललाट-पट्ट-पावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥२॥
 
ज्या शंकरांच्या जटांत अतिवेगाने विलासपूर्वक भ्रमण करणाऱ्या या देवी गंगेच्या धारा ज्यांच्या मस्तकावरुन प्रवाहित होत आहेत, ज्यांच्या मस्तकावर अग्नीच्या प्रचंड ज्वाळा धगधगत आहेत, त्या लघु चंद्राने विभूषित शिवासाठी माझा अनुराग प्रतिक्षण वाढत राहो.
 
धरा-धरेन्द्र-नंदिनीविलास-बन्धु-बन्धुर स्फुर-द्दिगन्त-सन्ततिप्रमोद-मान-मानसे . कृपा-कटाक्ष-धोरणी-निरुद्ध-दुर्धरापदि क्वचि-द्दिगम्बरे-मनो विनोदमेतु वस्तुनि ॥३॥
 
जे गिरीकन्या पार्वतीच्या विलासमय रमणीय कटाक्षात अत्यानंदित मनाने राहतात, ज्यांच्या मस्तकी संपूर्ण सृष्टी व प्राणिमात्र निवास करतात, तसेच ज्यांच्या कृपादृष्टीने भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात, अशा दिगंबर शंकरांच्या आराधनेत माझे मन सदा उल्हासित राहो.
 
जटा-भुजंग-पिंगल-स्फुरत्फणा-मणिप्रभा कदम्ब-कुंकुम-द्रवप्रलिप्त-दिग्व-धूमुखे  मदान् ध-सिन्धुर-स्फुरत्त्व-गुत्तरी-यमे-दुरे मनो विनोदमद्भुतं-बिभर्तु-भूतभर्तरि ॥४॥
 
मी त्या शंकरांच्या भक्तीत नेहमी आनंदी राहो जे सर्व प्राणिमात्रांचे रक्षणकर्ते आहेत, ज्यांच्या जटांत असणाऱ्या सापांच्या फण्यातील मण्यांचा प्रकाश पिवळ्या रंगाच्या प्रभा समूहरुपकेसराच्या कांतीने दिशांना प्रकाशित करत आहे आणि जे गजचर्माने विभूषित आहे.
 
सहस्रलोचनप्रभृत्य-शेष-लेख-शेखर प्रसून-धूलि-धोरणी-विधू-सरांघ्रि-पीठभूः  भुजंगराज-मालया-निबद्ध-जाटजूटक: श्रियै-चिराय-जायतां चकोर-बन्धु-शेखरः ॥५॥
 
ज्या शंकरांच्या चरणांवर सर्व देवतागण पुष्प-सुमन अर्पण करतात, ज्यांच्या जटेवर लाल सर्प विराजमान आहे, ते चंद्रशेखर आंम्हाला चिरकाल संपदा देवता.
 
ललाट-चत्वर-ज्वलद्धनंजय-स्फुलिंगभा- निपीत-पंच-सायकं-नमन्नि-लिम्प-नायकम्  सुधा-मयूख-लेखया-विराजमान-शेखरं महाकपालि-सम्पदे-शिरो-जटाल-मस्तुनः ॥६॥
 
ज्या शंकरांनी इंद्रादि देवतांचा गर्व दहन केला, कामदेवाला आपल्या विशाल मस्तकाच्या अग्नि ज्वाळेने भस्म केले, तसेच जे सर्व देवांना पूज्य आहेत, आणि जे चंद्र व गंगे द्वारे सुशोभित आहेत ते महादेव मला सिद्धी प्रदान करोत.
 
कराल-भाल-पट्टिका-धगद्धगद्धग-ज्ज्वल द्धनंज-याहुतीकृत-प्रचण्डपंच-सायके  धरा-धरेन्द्र-नन्दिनी-कुचाग्रचित्र-पत्रक -प्रकल्प-नैकशिल्पिनि-त्रिलोचने-रतिर्मम ॥७॥
 
ज्यांच्या मस्तकीच्या धगधगणाऱ्या प्रचंड ज्वाळेने कामदेवाला भस्म केले होते तसेच जे शंकर देवी पार्वतीच्या स्तनाच्या अग्रभागावर चित्रकारी करण्यात( येथे पार्वती म्हणजे प्रकृती, चित्रकारी म्हणजे सृजन) चतुर आहेत, त्या शंकरांंवर माझी प्रीती अटळ होवो.
 
नवीन-मेघ-मण्डली-निरुद्ध-दुर्धर-स्फुरत् कुहू-निशी-थिनी-तमः प्रबन्ध-बद्ध-कन्धरः  निलिम्प-निर्झरी-धरस्त-नोतु कृत्ति-सिन्धुरः कला-निधान-बन्धुरः श्रियं जगद्धुरंधरः ॥८॥
 
ज्यांचा कंठ नवीन मेघांनी परिपूर्ण असलेल्या अमावस्येच्या रात्री समान काळा आहे, जे की गज-चर्म, गंगा व लघु चंद्राने शोभायमान आहेत, तसेच जे जगाचे ओझे धारण करणारे आहेत, ते शंकर आम्हाला सर्व प्रकारच्या संपदा प्रदान करोत.
 
 
प्रफुल्ल-नीलपंकज-प्रपंच-कालिमप्रभा- -वलम्बि-कण्ठ-कन्दली-रुचिप्रबद्ध-कन्धरम् . स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकछिदं तमंतक-च्छिदं भजे ॥९॥
 
ज्यांचे कंठ व खांदे पूर्ण उमललेल्या नीलकमळाच्या पसरलेल्या सुंदर श्यामप्रभेने विभूषित आहेत, जे कामदेव आणि त्रिपुरासुराचे विनाशक, संसारातून दुःख संपवणारे , दक्षयज्ञ विनाशक, गजासुर व अंधकासुराचे संहारक आहेत तसेच जे लय तत्वाचे स्वामी आहेत, मी त्या शंकरांना भजतो.
 
 
अखर्वसर्व-मंग-लाकला-कदंबमंजरी रस-प्रवाह-माधुरी विजृंभणा-मधुव्रतम् . स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्त-कान्ध-कान्तकं तमन्तकान्तकं भजे ॥१०॥
 
जे कल्याणमय, अविनाशी, सर्व कलांचा रसास्वाद घेणारे आहेत, जे कामदेवाला भस्म करणारे आहेत, गजासुर अंधकासुर त्रिपुरासुराचे संहारक, दक्षयज्ञविध्वंसक तसेच प्रत्यक्ष यमराजासाठीसुद्धा यमस्वरुप आहेत, मी त्या शंकरांची आराधना करतो.
 
 ज्यांच्या मस्तकीच्या धगधगणाऱ्या प्रचंड ज्वाळेने कामदेवाला भस्म केले होते तसेच जे शंकर देवी पार्वतीच्या स्तनाच्या अग्रभागावर चित्रकारी करण्यात( येथे पार्वती म्हणजे प्रकृती, चित्रकारी म्हणजे सृजन) चतुर आहेत, त्या शंकरांंवर माझी प्रीती अटळ होवो.
 
<br />
[[वर्ग:महिला संपादनेथॉन २०२० लेख]]