"दही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
आंबवलेल्या [[दूध|दुधाला]] '''दही''' असे म्हणतात. [[दूध|दुधाचे]] दही तयार करण्यासाठी दूधात विरजण घालतात. घरगुती दही तयार करणे खूप सोपे आहे.आपण स्वादिष्ट दही घरी बनवू शकतो.शिवाय यामध्ये कोणतेही रासायनिक घटक टिकवण (जे पदार्थ खूप काळ टिकवण्यासाठी वापरतात) वापरण्याची गरज नाही.उन्हाळ्यात, दही आमच्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे दररोज दुपारच्या जेवणासाठी दही असते. रायता, ताक, कढी किंवा कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी दही वापरतात.दह्याचे आरोग्यास बरेच फायदे आहेत दही पचायला खूप सोपे आहे. दही पचायला खूप सोपे आहे.  व हे  प्रोबायोटिक म्हणून कार्य करते. दही खाल्याने  प्रतिकारशक्ती सुधारते. तसेच हे मजबूत हाडे आणि दातांसाठी, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी फायदेशीर आहे .
 
== '''<big>दुधाचे दह्यामधे रूपांतर करण्याची प्रक्रिया</big>''' ==
 
जेव्हा दुध गरम (कोमट) असताना त्यात थोडे दही टाकले जाते तेव्हा -दह्यातील लॅक्टोबॅसिलस बॅक्टरीयाचा गुणाकार होतो आणि म्हणून [[दूध]] दह्यामधे रुपांतरीत होते या प्रक्रियेस किण्वन प्रक्रिया किंवा फेरमेंटेशन असे म्हणतात. किण्वन प्रक्रियेद्वारे दुधाचे दह्यामधे रुपांतर होते. दुधात केसिन नावाचे ग्लोब्युलर प्रथिने असतात. लैक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आणि केसीन दरम्यानच्या रासायनिक प्रतिक्रियेमुळे दही तयार होते. किण्वन प्रक्रीये दरम्यान, बॅक्टेरिया लैक्टोजपासून ऊर्जा (एटीपी) तयार करण्यासाठी एंझाइम्स वापरतात. हे एटीपी वापरून लैक्टिक ऍसिड तयार होते. दुधात असलेले ग्लोब्युलर प्रोटीनवर लॅक्टिक ऍसिड काम करते आणि पचायला जड असलेले प्रोटीनचे छोट्या आणि पचायला हलके असलेल्या प्रथिनात रूपांतर करते. या प्रक्रियेमुळे प्रोटीनची तृतीयक आणि चतुष्कीय रचना नष्ट होते आणि ग्लोब्युलर प्रथिने तंतुमय प्रथिने बनतात आणि अशा प्रकारे प्रथिने विघटना मुळे दह्याचा जाड पोत (घट्टपणा) तयार होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दही" पासून हुडकले