"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
removing copyrighted text from https://vishwakosh.marathi.gov.in/21254/
ओळ ३३:
कोळी महादेव परंपरेनुसार पश्चिम दख्खनमध्ये मूळ रूपात किल्ले-गडांच्या आसपास राहत. यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, रावणाच्या दरबारात हे संगीतकार होते. गवळयांनी गडांशांवर(?) विजय मिळविला. गवळयांनी या प्रदेशाच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारले. राजाने खानदेशातून कासरबारी घाटातून गवळयांना पराभूत करण्यासाठी सैन्य पाठविले. परंतु कासरबारी घाटाजवळच उठावकर्त्यांनी सैन्याला हरविले. या प्रदेशावर विजय मिळविण्यासाठी राजाने सरदारांना मोठे बक्षीस देण्याचे घोषित करुनसुद्धा एकही सरदार उठाव मोडण्यास तयार झाला नाही. अखेरीस सोनाजी गोपाळ या मराठा सरदाराने व्यंकोजी कोकाटा या कोळी महादवाच्या सहकार्याने गवळयांचा नाश केला. आणि या प्रदेशावर पूर्ववत महादेव कोळ्यांच राज्य आल. रुढीनुसा कोळी महादेव हे सह्याद्रीतच असल्याचा आणि हेच त्याचं राज्य असल्याचा सबळ पुरावा असा मिळतो की, पेशवे काळापूर्वी लिंगायताचे रावळ गोसावी हे कोळी महादेवाचे पुजारी म्हणून सह्याद्रीमध्ये रहात होते. यांचे वंशज सन १८३६मध्येसुद्धा छास (?) व मंचरमध्ये वास्तव्य करत होते.
 
==देवदेवता==
महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत.पागोटे बांधणारे महादेव कोळ्यांचे दैवत आहे. परंतु महादेव कोळ्यांची वरसूबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई,महादेव इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे,मोडा पाळणे,वाघ बारस, [[आखाजा चा पाडवा]] वगैरे सण पाळतात. कळमजाई देवीलाही पूजतात. कळसूबाई, जाकूबाई, सतूबाई, रानाई ,घोरपडाई,देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. हिंदू धर्माच्या संपर्कात आल्याने [[विठोबा|विठोबाचे]] माळकरीही समाजात आढळतात. परंतु आता बदल होत आहे. आपण धर्म संकल्पनेत येत नाही याची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यामुळे माळकरी टाळकरी यांच्यात घट होऊन आदिवासी तयार होत आहेत. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.
 
==रूढी व परंपरा==
समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. हलिंद(??) व बाळंतिणीला [[बाजरी|बाजरीचे]] पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सटवीची पूजा करतात. जमलेल्या आप्‍तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.
 
या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्‍न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी महादेव कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.
 
==उपजीविका व व्यवसाय==