"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
'''मोरेश्वर रामचंद्र पराडकर''' तथा '''मोरोपंत''', '''मयूर पंडित''' ((जन्म : [[पन्हाळगड]] इ.स. १७२९|१७२९]]; मृत्यू : [[पन्हाळगडबारामती]], -चैत्री पौर्णिमा, [[१५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते [[मुक्तेश्वर]], [[इ.स.वामन १७२९|१७२९पंडित]], चैत्री पौर्णिमा:[[बारामतीरघुनाथ पंडित]]) हेआणि मध्ययुगीन[[श्रीधरकवी|श्रीधर]] मराठीयांचे पंडितीसमकालीन काव्यपरंपरेतील श्रेष्ठपंडित कवी होते.
 
हे [[मुक्तेश्वर]], [[वामन पंडित]], [[रघुनाथ पंडित]] आणि [[श्रीधरकवी|श्रीधर]] यांचे समकालीन पंडित कवी होते.
 
पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे [[कोकण]] येथील [[सौंदळ]] गावचे होय. मोरोपंतांचा जन्म [[पन्हाळगड]] येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने [[कोकण|कोकणातून]] [[पन्हाळगड|पन्हाळगडावर]] येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते [[कोल्हापूर]]च्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. [[पन्हाळगड|पन्हाळगडावरील]] [[केशव पाध्ये]] व [[गणेश पाध्ये]] या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी [[न्याय]], [[व्याकरण]], [[धर्मशास्त्र]], [[वेदान्त]] व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे [[पन्हाळगड|पन्हाळगडावर]] वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून [[बारामती]]स गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून [[बारामती]]स गेले व कायमचे [[बारामती]]कर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन [[बारामती]]स झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्‍या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार [[आर्या]], [[श्लोक]]बद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी [[ओवी]]बद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतांनी त्यांच्या चार गुरूंचा उल्लेख आपल्या 'गंगावकिली' या काव्यात केला आहे. ते म्हणतात, 'गुरू माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश, हरि, चवघे'. हरी म्हणजे पंतांचे मौजीबंधन करणारे त्यांचे सौंदळचे कुलोपाध्याय हरभट वरेकर. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास - भाग सातवा|last=देशपांडे|first=अच्युत नारायण|publisher=व्हीनस प्रकाशन|year=१९८८|location=पुणे|pages=१०१}}</ref> श्रीराम म्हणजे वडिल रामजीपंत. गोळवलकर घराण्यातील केशव पाध्ये व गणेश पाध्ये हे दोघे बंधू अशा चार गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी केलेल आहे. <ref name=":0" />
 
[[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे]]कालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. [[बारामती]]तील [[कर्‍हा नदी]]काठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.
 
==मोरोपंतांचे काव्य==
मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. काव्यरचनेला प्रारंभ त्यांनी वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी केला असे मानल्यास पहिली दहा वर्षे (सुमारे१७५० ते १७६०) त्यांनी उमेदवारीत घालवली असे म्हणता येईल. विविध वृत्तांमध्ये रचिलेले 'कुशलवोपाख्यान' हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रम्होत्तर खंड आर्यावृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यागीतावृत्तात कृष्णविजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हादविजयाची रचनाही त्याच वृत्तात केली. यापुढील पाच वर्षांचा काळ (१७६१ ते १७६५) त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. पूर्वी आर्यागीतिवृत्तात आरंभिलेला कृष्णविजय हा काव्यग्रंथ त्यांनी या काळात श्लोकबद्ध रचनेने पुढे चालविला. त्यापुढील तिसरा कालखंड १७६६ ते १७७२ पर्यंतचा सहा वर्षांचा असून या काळातील रचनेचा मुख्य विशेष म्हणजे आर्यावृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्णविजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्रीगीत आणि रुक्मिणीगीत ही तीन ओवीबद्ध काव्ये याच काळात लिहिली गेली. मंत्ररामायण, आर्याकेकावली, संशयरत्नावली, नामसुधाचषक इत्यादी ईशस्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होत. यापुढील दहा वर्षांचा (१७३३ ते १७८३) कालखंड मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारतरचनेचा कालखंड म्हणता येईल. आतापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या दहा वर्षांत त्यांनी त्याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या सु. बारा वर्षांत मंत्रभागवत, हरिवंश, संकिर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोककेकावली हे त्यांचे अखेरअखेरचे काव्य असावे असे त्यातील, ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या उद्‌गारांवरून वाटते.
 
मोरोपंतांनी १०८ रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.
Line २१ ⟶ २२:
‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची !!
 
मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असताअसतां, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले.
 
ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले,
Line ५१ ⟶ ५२:
* [[सीतागीत]]
* हरिवंश
 
 
 
 
 
 
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी [[आर्यावृत्तात]] रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.
Line ७५ ⟶ ७१:
* बारामतीमधील कऱ्हा नदीच्या काठावरील मोरोपंतांच्या जुन्या वाड्याचे स्मारकात रूपांतर (बांधकाम अंतिम टप्प्यात)
* मोरोपंतांच्या स्मारक समितीतर्फे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बारामतीच्या(?) सिद्धेश्वर मंदिरात व्याख्यानमाला आणि पतसंस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण होते.
 
==मोरोपंतांच्या काव्याची साधकबाधक चर्चा करणारे लेख==
मोरोपंतांच्या कवितेचा प्रसार त्यांच्या काळात विठोबादादा चातुर्मासे, शाहीर रामजोशी वगैरेंनी पुष्कळ केला. त्यानंतरही हरिदासांनी व कीर्तनकारांनी त्यांची कविता लोकप्रिय केली. परंतु त्यांच्या कवितेविषयी टीकाकारांत मतैक्य नाही. त्यांच्या काव्यातील यमकजन्य क्लिष्टतादी दोषांची चर्चा आजवर पुष्कळ झाली आहे. परंतु विशेषतः त्यांच्या केकावलीवर न्या. रानडे यांच्यासारख्यांनी आक्षेप घेतल्यामुळे मोरोपंतांची कविता हा एक वादविषय होऊन राहिला. त्याचे संपूर्ण दर्शन व मोरोपंतांचे प्रभावी समर्थन [[विष्णूशास्त्री चिपळूणकर}}ांच्या निबंधमालेतील ‘मोरोपंतांची कविता’ या प्रदीर्घ लेखात होते. त्यानंतरही [[ल.रा. पांगारकर]] आणि [[श्री.ना. बनहट्टी]] यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून मोरोपंती कवितेचे रसिकावलोकन पुष्कळ केले. पण शेवटी ‘मोरोपंतांनी आपल्या वाक्‌कन्यकेला नानाविध अलंकारांनी नटवून सजवून आपल्या रसिक वाचकांबरोबर तिचे सालंकृत कन्यादानच करून दिले आहे’, हा महाराष्ट्रसारस्वतकार भावे यांचाच अभिप्राय योग्य वाटतो. मोरोपंतांच्या सुसंस्कृत व समृद्ध काव्यरचनेमुळे मराठी भाषा श्रीमंत झाली यात संशय नाही.
 
==मोरोपंतांची चरित्रे आणि त्यांच्या काव्याची चर्चा करणारे ग्रंथ==
* मयूरकाव्यविवेचन ([[श्री.ना.बनहट्टी]], १९२६)
* मोरोपंत : चरित्र आणि काव्यविवेचन ([[ल.रा. पांगारकर]])
* मोरोपंतांचे समग्र काव्य (९ खंड, १९१२–१६, संपादक - रा.द. पराडकर). पुढे या ग्रंथाचे पुनर्मुद्रण झाले. त्याचे संपादन [[अ.का. प्रियोळकर]], अ.का. पराडकर, [[मो दि. जोशी]], दामोदरपंत यांनी ते 'कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ (९ खंड)' या नावाने १९६४–७२ या काळात प्रसिद्ध केले).
 
==बाह्य दुवे==
Line ८४ ⟶ ८८:
[[वर्ग:इ.स. १७२९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]