"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच [[पेशवाई]] आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. [[इंग्लिश लोक|इंग्रजांचा]] पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
 
[[माधवराव पेशवे|थोरल्या माधवराव पेशव्यांच्या]] मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांच्या]] मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, [[पुणे|पुण्याचे]] वैभव वाढवले. [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांच्या]] अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला. [[वाई]] येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे. नानावाड्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत [[टिळक]]-[[आगरकर]]-[[विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल भरत होती. जवळच असलेल्या वसंत टाॅकीजमधील गोंगाटाच्या त्रासाला कंटाळून डेक्कन एज्युकेशन सोसयटीने ही शाळा टिळक रोडवर नेली. नान वाड्यात हल्ली पुणे महापालिकेचे हायस्कूल आहे.
 
नानावाड्याच्या समोरच्या हौदाला नाना हौद म्हणतात. या हौादाला थेट कात्रजहून पाणीपुरवठा होतो, त्यामुळे या हौदाला बाराही महिने पाणी असते. पुणे महापालिकेवर हा हौद अवलंबून नाही.माहापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली, तरी या हौदाला तिची झळ बसत नाही.