"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३०:
'''मानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे ‍'''
 
* वर्तन आणि विचार प्रक्रिया यांच्याबद्दल माहिती मिळवणे/ वर्तनाचे वर्णन करणे :-
कोणतेही वर्तन जाणून घेण्यातील पहिली पायरी म्हणजे त्या वर्तनाला नाव देणे. वर्तनाचे निरीक्षण करणे, त्या संबंधीच्या सर्व नोंदी करणे यांचा अंतर्भाव वर्णनात होतो. काय वर्तन घडत आहे? कुठे घडत आहे? कोणा बाबतीत घडत आहे?आणि कोणत्या परिस्थितीत घडत आहे?इत्यादींचे निरीक्षण,त्यासंबंधीच्या सविस्तर नोंदी म्हणजे वर्तनाचे वर्णन होईल. उदाहरणार्थ-दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थिनींच्या वर्तनातील काहीतरी विचित्रपणा शिक्षकांच्या निदर्शनास येतो.ही विद्यार्थिनी वेळेच्या वेळी गृहपाठ करत नाही.परीक्षेतील गुणांमध्ये घसरण होत आहे.शाळेविषयी तीचा दृष्टिकोनही नकारात्मक आहे.हे 'सर्व काय घडत आहे' याचे वर्णन होय. वर्तनाच्या अभ्यासातील हे पहिले देह पूर्ण केल्यानंतर त्यानंतरचे ध्येय म्हणजे ती विद्यार्थिनी असे का वागत आहे. याचा शोध घेणे.
 
*वर्तन समजून घेणे/ स्पष्टीकरण:-
ती विद्यार्थिनी हे सर्व का करत आहे,याचा शोध लावण्यासाठी शिक्षक शालेय समुपदेशकाला त्या विद्यार्थिनीला सुयोग्य मानसशास्त्रीय चाचण्या देण्यास सांगतील.तिच्या पालकांनी तिला बालरोगतज्ञांकडे नेऊन तिला कसली ॲलर्जी अथवा शारीरिक आजार नाही ना याची खातरजमा करून घ्यावी.असेही शिक्षक सुचवतील.कदाचित तिचे पालक तिला काही मानसशास्त्रीय तपासणी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडेही नेतील. दुसर्‍या शब्दात सांगावयाचे झाल्यास या विद्यार्थिनीच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतील.कोणत्याही वर्तनासंबंधीचा सिद्धांत प्रस्थापित करण्यात येईल. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.निरीक्षीतवर्तन अथवा बाबींचे सर्वसामान्य स्पष्टीकरण करणे म्हणजे सिद्धांत होईल.वर्तनाचे वर्णन करणे.या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नातून वर्तनाचे निरीक्षण घडते.तर वर्तनाचे स्पष्टीकरण करण्याच्या यशस्वी प्रयत्नामुळे सिद्धांत निर्मिती होते. वरील सर्व मार्गांचा अवलंब केल्यानंतर शिक्षकांना असे आढळले की, या विद्यार्थिनीला अध्ययन समस्या (उदाहरणार्थ वाचन अक्षमता) आहे. ज्यामुळे ती तिच्या वयाच्या इतर सर्वसामान्य बुद्धीमत्तेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे वाचन करू शकत नाही.यानंतरचा टप्पा येतो तो पूर्व कथनाचा हे असेच चालू राहिले तर काय घडू शकते.याचे पूर्वकथन करण्याचा प्रयत्न केला जाईल.
*वर्तनासंबंधी भविष्यकथन करणे :-
भविष्यात काय घडेल.हे ठरविणे म्हणजे पूर्वकथन होय. उपरोक्त उदाहरणात बाबत बोलायचे झाल्यास मानसशास्त्रज्ञ अथवा समुपदेशक तत्सम परिस्थितीतील पूर्व संशोधनाचा आधार घेतील,आणि असे पूर्वकथन करतील की,विद्यार्थिनींचे शालेय वर्तन कायम निकृष्ट दर्जाचे राहील.ती तिच्या वयाला अनुरूप अध्ययन क्षमतेचे प्रकटीकरण कधीच करू शकणार नाही.
*वर्तनाला नियंत्रित करणे किंवा वर्तनात बदल घडविणे :-
नियंत्रणात वा विशिष्ट वर्तनातील सुधारणात्मक बदल हा एकेकाळी वादाचा विषय होता.काही लोकांच्या मते नियंत्रण म्हणजे ब्रेनवॉशिंग परंत मानसशास्त्राच्या या ध्येयात हा अर्थ अभिप्रेत नाही.एखादे अनिश्चित वर्तन (उदाहरणार्थ परीक्षेत नापास होणे)हे इच्छित वर्तनात बदल म्हणजे नियंत्रण,आणि हे मानसशास्त्राचे एक ध्येय आहे.वरील उदाहरणातील वाचन क्षमता असलेल्या विद्यार्थिनीच्या बाबतीत काही अध्ययन तंत्र वापरून वाचन कौशल्य सुधारणा घडविता येईल. मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नातून या विद्यार्थिनींसाठी सुयोग्य प्रशिक्षण तंत्र योजता येईल.
अर्थात येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.ती अशी की सर्व मानसशास्त्रीय संशोधन ही चारही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतील असे नाही.काही संशोधनांमध्ये वर्णन व पूर्वकथन यांवर अधिक भर असेल.काही विशिष्ट परिस्थितीत लोक काय करतील.यासंबंधी अनुमान मानतील काही मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात रुची ठेवतील.जसे की प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांनी निरिक्षित वर्तनाचे म्हणजेच वर्णिलेल्या वर्तनाचे स्पष्टीकरण शोधण्यासाठी संशोधन करतील.मानसउपचार तंत्रज्ञ मात्र वर्तन नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करतील. असे करताना इतर तीन साहाय्यभूत ठरतील.
 
'''मानसशास्त्रातील संप्रदाय'''
वर्तनासंबंधी भविष्यकथन करणे
 
वर्तनाला नियंत्रित करणे किंवा वर्तनात बदल घडविणे
 
'''मानसशास्त्रातील संप्रदाय'''
 
वर्तनवाद