"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग '''Bhir''' असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.
 
बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
 
बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.
 
[[चित्र:कंकालेश्वर.jpg|इवलेसे]]
कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने [[पाण्याने]] वेढलेले आहे . मंदिराचे दगडी बांधकाम आहे. येथील कंकालेश्वर महोत्सव प्रसिद्ध आहे.
{{संदर्भनोंदी}}
{{बीड जिल्हा}}
[[वर्ग:बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
*येथील'कन्कालेश्वर'महोत्सव हा प्रसिद्ध आहे.
५७,२९९

संपादने