"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Spelling
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५:
}}
 
''हा लेख बीड शहराविषयी आहे. [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्याच्या]]च्या माहितीसाठी [[बीड जिल्हा|येथे]] टिचकी द्या''
 
'''बीड''' (Beed) हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक शहर आहे, आणि [[महाराष्ट्रातील जिल्हे|३६ जिल्ह्यांपैकी]] एक असलेल्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या [[मराठवाडा]] विभागात मोडतो.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका म्हणून ओळखला जातो.
 
==वैशिष्ट्ये==
बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. [[महाराष्ट्र]] राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची [[खजाना विहीर]] (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिद्फना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे बीड हे सितफलासाठी प्रसीद्ध आहे. सर्वात जास्त आत्महत्या येथें शेतकरी वर्गच्या दिसतात. [[छोटेवाडी]] नावचे छोटे गावं आहे.
 
==इतिहास==
बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्‍यातखोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग '''Bhir''' असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.
 
बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणार्‍याजोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
 
बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.
 
किल्ले मैदान, लक्ष्मीबाग==
बीडचा तुरुंग [[इ.स. १९३४]] सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकार्‍यांच्याअधिकाऱ्याच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.
 
==शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने==
Line ७९ ⟶ ७६:
 
==धोंडीपुरा==
बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व 'धोंडीपुरा' करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण या भागात राहणार्‍याराहणाऱ्या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुर्‍यातीलधोंडीपुऱ्यातील मशिदीलाही जागा दिली होती, असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे. त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती.
 
==हिरालाल चौक==
पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणार्‍या भागाचेजाणाऱ्याभागाचे पूर्वीचे नाव महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला (इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले. पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना निवडले ते कट्टर गांधीवादी हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो. 'बलभीम चौक' या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ 'चौक' या नावानेच ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणार्‍याराहणाऱ्या कदम घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे.
 
==नेताजी मैदान==
Line ९६ ⟶ ९३:
 
==गाजीपुरा==
गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन) नावावरून सन इ.स. १६८५ मध्ये ठेवले.
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत दिव्यमराठी
"https://mr.wikipedia.org/wiki/बीड" पासून हुडकले